‘तुम्ही कधी भांडी घासली आहेत का?’ स्पर्धकाच्या सवालावर बिग बीं यांचा मोठा खुलासा

‘तुम्ही कधी भांडी घासली आहेत का?’ स्पर्धकाच्या सवालावर बिग बीं यांचा मोठा खुलासा

Amitabh Bachchan On KBC 15 : बॉलिवूडचे महानायक बिग बीं म्हणजेच

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) रुपेरी पडदा गाजवण्यासह छोट्या पडद्यावर देखील ते कायम अॅक्टिव्ह असतात. (KBC 15) बिग बी सध्या ‘कौन बनेगा करोडपती 15’ (Kaun Banega Crorepati 15) हा कार्यक्रम होस्ट करताना बघायला मिळत असतात. या कार्यक्रमाच्या मंचावर ते अनेक गोष्टींवर खुलासा करत असतात. आता या कार्यक्रमाच्या मंचावर त्यांनी घरातील काम करण्याबद्दल मोठा खुलासा केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)


‘केबीसी’च्या मंचावर असलेला हर्ष शाह नामक स्पर्धक बिग बीं यांना थेट सवाल विचारला आहे की,”तुम्ही कधी घरातील भांडी घासली आहेत का? यावर उत्तर देत बिग बीं सांगितले आहेत की, ‘मी आजवर अनेकदा भांडी घासली आहेत. स्वयंपाकघरातील चिमनी साफ केली. बाथरूममधील बेसिन सुद्धा साफ केलं आहे. मी घरातील काम करू शकत नाही, असं तुम्हाला का वाटलं? असे त्यांनी यावेळी केबीसी’च्या हर्ष शाह नामक स्पर्धकाला विचारले.

‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati 15) हा कार्यक्रम 2000 पासून चाहत्यांचं मोठ्या प्रमाणात मनोरंजन करत आहे. 2000 पासून आजही या कार्यक्रमाची क्रेझ कायम बघायला मिळत आहे. अमिताभ बच्चन पहिल्या पर्वापासून हा कार्यक्रम होस्ट करत आहेत. बिग बीं यांच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता मोठी उत्सुकता लागली आहे. या सिनेमांची चाहते खूपच वाट पाहत आहेत.

‘नाळ भाग 2’ सिनेमा चित्रपटगृहात पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी महेश मांजरेकर यांनी केली ‘ही’ विनंती

अमिताभ बच्चन यांचा वर्क फ्रंट

अमिताभ बच्चन नुकतेच टायगर श्रॉफच्या गणपत चित्रपटात दिसले होते. मात्र, त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आता बिग बींकडे रजनीकांतसोबत ‘कल्की 2898 एडी’ आणि ‘थलैवर 170’ देखील आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube