Amitabh Bachchan: बॉलीवूडचे बिग बी यांच्याविरोधात तक्रार दाखल, काय आहे नेमकं प्रकरण?

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 24T102942.232

Amitabh Bachchan: बॉलीवूडचे (Bollywood) बिग बीं म्हणजेच महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे कायम कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. परंतु ते आता आणखी एका प्रकरणामुळे जोरदार चर्चेत आले आहेत, त्यांनी मोबाईल कंपनीची केलेली जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यामुळे अनेक विक्रेत्यांनी बिग बीं विरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)


सीएआयटीने सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीकडे (CCPA) यांनी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये ही जाहिरात दिशाभूल करणारी आणि देशातील छोट्या विक्रेत्यांविरुद्ध, दुकानदारांविरूद्ध असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून ही जाहिरात मागे हटवण्याची मागणी यावेळी केली आहे. खोट्या आणि दिशाभूल करणार्‍या जाहिरातींसाठी ग्राहक संरक्षण कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार फ्लिपकार्टकडून दंड आकारण्यात यावा आणि बच्चन यांना १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा, अशी मागणी व्यापारी संघटनेनी यावेळी केली आहे.

तसेच फ्लिपकार्टला ईमेल देखील पाठवण्यात आला आहे. परंतु त्याच्याकडून कोणतंही प्रतिसाद मिळाला नसल्यचे समोर आले आहे. आणि प्रतिक्रियेसाठी बिग बीं यांच्याशी देखील संपर्क होऊ शकला नाही, व्यापारी संघटनेनी सांगितले. “कलम २(४७) मधील व्याख्येनुसार फ्लिपकार्ट बिग बीं यांच्यामार्फत ती जाहिरात देत आहेत. देशाच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये विक्रेते/पुरवठादारांकडून मोबाईल फोन ज्या किमतीत विकले जात आहेत, त्याविषयी जनतेची दिशाभूल केल्याचे आरोप होत आहे. यामुळे दुसर्‍या व्यक्तीच्या वस्तू, सेवा किंवा व्यापारावर परिणाम होतो,” असे सीएआयटीचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी आपल्या तक्रारीमध्ये सांगितले आहे. यासंदर्भात ‘डीएनए’ने वृत्त दिल्याचे समोर आले आहे.

Jaya Prada : जया प्रदा हाजिर हो! न्यायालयानं काढला जामीनपात्र वारंट; नेमकं प्रकरण तरी काय?

फ्लिपकार्टच्या ज्या जाहिरातीवरून वाद पेटला आहे. त्यामध्ये बिग बीं म्हणतात की बिग बिलियन डे सेलमध्ये मोबाईल ज्या किमतीत मिळणार आहेत, त्या किमतीमध्ये ते कोणत्याच मोबाईल स्टोअरमध्ये ऑफलाइन मिळणार नाही. बिग बिलियन डेज सेल ८ ते १५ ऑक्टोबर दरम्यान होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. दिशाभूल करणार्‍या जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि दिशाभूल करणार्‍या जाहिराती, २०२२ च्या नियम ४ नुसार, फ्लिपकार्टची जाहिरात दिशाभूल करणारी असल्याचे समोर आले आहे. कारण त्यामध्ये कोणतेही सत्य नाही. ती पूर्णपणे चुकीची आणि दिशाभूल करणारी जाहिरात असल्याचे खंडेलवाल यांनी यावेळी सांगितले आहे.

Tags

follow us