Jaya Prada : जया प्रदा हाजिर हो! न्यायालयानं काढला जामीनपात्र वारंट; नेमकं प्रकरण तरी काय?

Jaya Prada : जया प्रदा हाजिर हो! न्यायालयानं काढला जामीनपात्र वारंट; नेमकं प्रकरण तरी काय?

Jaya Prada : काही दिवसांपूर्वी चित्रपट अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा (Jaya Prada) यांना चेन्नई न्यायालायने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. दरम्यान, दुसऱ्या एका प्रकरणात कोर्टाने त्यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट (Bailable Warrant) जारी केला आहे. जया प्रदा यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केल्याप्रकरणी न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. सुनावणी प्रकरणी न्यायालयाने त्यांना समन्स बजावले होते, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या न्यायालयात हजर राहिल्या नाहीत. त्यामुळं ही सुनावणी आता 11 ऑक्टोबर रोजी होणार असून कोर्टाने जामीनपात्र वारंट जारी केला.

दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार झाल्यानंतर समाजवादी पक्षाच्या खासदारांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात नेत्यांनी रामपूरच्या माजी खासदार जयाप्रदा यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केली होती. हा सत्कार समारंभ कार्यक्रम काटघर परिसरात असलेल्या मुस्लिम पदवी महाविद्यालयात आयोजित केला होता. या प्रकरणी रामपूरच वकील महमंत मुस्तफा यांच्या तक्रारीवरून सपा नेते आझम खान, डॉ. एसटी हसन, अब्दुल्ला आझम, फिरोज खान, आयोजक मोहम्मद अरीझ, रामपूरचे माजी अध्यक्ष अझहर खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता.

जेव्हा पक्ष सांगेल, तेव्हा मी नागपूरला जाईल; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

विशेष सरकारी वकील मोहनलाल विश्नोई यांनी सांगितले की, बुधवारी सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. दरम्यान माजी खासदार जयाप्रदा यांना फिर्यादीच्या वतीने न्यायालयात हजर राहून त्यांचे म्हणणे नोंदवायचे होते. परंतु त्यांच्या वकिलाने स्थगिती अर्ज दिला. न्यायालयाने याप्रकरणी माजी खासदार जयाप्रदा यांच्याविरोधात पुन्हा जामीनपात्र वॉरंट जारी केलाय. न्यायालयानं ११ ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिलेत.

विशेष सरकारी वकील मोहनलाल यांनी याबाबत सांगितले की, आज सत्र न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी झाली आहे. दरम्यान,  प्रदा यांना फिर्यादीच्या वतीने न्यायालयात हजर राहून त्यांची बाजू मांडायची होती. मात्र त्यांच्या वकिलाने स्थगिती अर्ज दाखल केला. या प्रकरणी कोर्टाने जया प्रदा यांच्याविरोधात आज जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाने त्यांना 11 ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले.

जया प्रदा यांनी 1994 मध्ये तेलुगु देसम पार्टीमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1996 मध्ये त्या पहिल्यांदा आंध्र प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून गेले. यानंतर 2004 मध्ये त्या समाजवादी पक्षात दाखल झाल्या आणि दोनदा लोकसभेच्या खासदार झाल्या. त्यांनी राष्ट्रीय लोकदलाकडून लोकसभा निवडणूकही लढवली होती. नंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube