अ‍ॅक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफचा ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओ सोशल मीडियावर होतो व्हायरल!

Tiger Shroff Transformation Video; टायगर श्रॉफने नुकताच पोस्ट केलेला सहा सेकंदांच्या ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओ ने चर्चांना उधाण.

Tiger Shroff Transformation Video

Tiger Shroff Transformation Video: अ‍ॅक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफने नुकताच पोस्ट केलेला सहा सेकंदांच्या ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओ ने चर्चांना उधाण आल्याचं दिसतंय. टाइगरने इंस्टाग्राम वर हा व्हीडीओ शेयर केला असून त्याचा फिटनेस प्रवास हा थक्क करणारा आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली असून त्याच्या चाहत्यांनी त्याने आणखी अ‍ॅक्शन चित्रपट करावेत अशी विनंती केली आहे.

…त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वाटतय, विक्रम पाचपुतेंची रोहित पवारांवर बोचरी टीका

आपल्या शरीरयष्टीबाबत प्रामाणिकपणा आणि शिस्तीसाठी ओळखला जाणारा टायगर अनेकदा आपल्या नव्या फिटनेस जर्नी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. वर्कआउट रूटीन आणि काही अ‍ॅक्शन स्टंट्सनी सगळ्यांना कायम प्रेरित करतात. या खास व्हिडिओमध्ये अभिनेता शर्टलेस दिसत असून तो आपले सिक्स-पॅक अ‍ॅब्स आणि परफेक्ट बायसेप्स फ्लॉन्ट करताना दिसत आहे. त्याने याला कॅप्शन दिले, ‘6 weeks transformation too boring … here’s a 6-second transformation, blink n you miss.’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger shroff (@tigerjackieshroff)

विशेष म्हणजे चाहत्यांना टायगरचे याआधीचे अ‍ॅक्शन अवतार आठवले आणि त्यांनी त्याला पुन्हा पुन्हा काही हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन ड्रामांमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

Satara DCC Bank Election : सातारा जिल्हा बँकेवर उदयनराजे पुन्हा बिनविरोध; विरोधकाने अर्ज मागे घेतला

युवा अ‍ॅक्शन स्टारने सोशल मीडियावरील आपल्या रीलने नक्कीच सर्वांना नॉस्टॅल्जिक केले आहे आणि नजीकच्या भविष्यात त्याच्यासाठी काय आहे याबद्दल त्याच्या फॉलोअर्समध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. एक गोष्ट मात्र नक्की! आपल्या चाहत्यांमध्ये सोमवारच्या सकाळी खळबळ कशी निर्माण करायची हे टायगरला नक्कीच माहीत आहे.

follow us