‘नाळ भाग 2’ सिनेमा चित्रपटगृहात पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी महेश मांजरेकर यांनी केली ‘ही’ विनंती

‘नाळ भाग 2’ सिनेमा चित्रपटगृहात पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी महेश मांजरेकर यांनी केली ‘ही’ विनंती

Mahesh Manjrekar On Naal 2: मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकरांना (Mahesh Manjrekar) यांना ओळखले जाते. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, कणखर आवाज आणि करारी नजर यामुळे त्यांची कायमच चर्चा असते. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही त्यांचा मोठा दबदबा आहे. त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी अनेक मराठी सिरीयल, चित्रपटासह हिंदी सिरीयलही केल्या आहेत. मराठी चित्रपटांना एक वेगळाच दर्जा मिळवून देण्यात मोलाचा वाटा आहे. मुंबई अंडरवर्ल्डवरील वास्तव हा सिनेमा बॉलीवूडमध्ये (Bollywood) खूप गाजला होता. आता त्यांनी ‘नाळ भाग 2’ (Naal2 Marathi Movie) या मराठी सिनेमाचे तोंडभरून केले कौतुक केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)


दिग्दर्शक महेश मांजरेकर ‘नाळ भाग 2′ ( (Naal2 Movie)) या सिनेमाचे तोंडभरून केले कौतुक करताना सांगितले आहे की, नाळ भाग 2’ हा सिनेमा मी पाहिलं. हा सिनेमा अप्रतिम आहे. त्यांनी मराठी सिनेमा एवढा चांगला होतोय, मात्र वाईट एकाच गोष्टीच वाटलं की, फार लोक या सिनेमाला नाहीयेत, का? ते मला कळेल नाही. चांगला सिनेमा बघायचायं, सध्या महाराष्ट्रात इतके अप्रतिम सिनेमे होत आहेत. आणि कोणी ऑडियन्स येत नाही. माझं तर म्हण आहे की, जायचं नशीब वाईट असेल, त्यांच्या नशिबात सिनेमा नाहीय. इतकं सुदंर सिनेमा आहे. आपण माजीद याना फिल्ममेकर यांना म्हणतो, त्यांचे सिनेमे उत्तम असतात असे आपण म्हणतो, पण त्यांनी जरी हा सिनेमा पाहिला तर त्यांनी देखील माजीद,,,माजीद म्हणतीलमी इतका सुंदर हा सिनेमा आहे.

सध्या कन्नड सिनेमा हिंदीत डफ केलेला असतो, आणि तो सुपरहिट होतो. जसे की, RRR किंवा पुष्पा म्हणा, माझं खरंच मराठी निर्मात्यांना असं म्हणणं आहे की, आपली मराठी सिनेमे डफ करावेत की, हिंदी आणि मराठी मध्ये खूप काही फरक नाही. आणि ते वाईटही वाटणार नाही. ‘नाळ 2’ हा सिनेमा देशात सर्वानी बघायला पाहिजे. त्यात तीन मुलांची काम आहेत. जगात एवढं सुंदर काम मी पहिल्यांदा पाहिलं आहे. आणि उद्या कधीतरी नॉमिनेशन काढलं तर त्यामध्ये एका मुलीने काम केले आहे. तिला कृपा करून बेस्ट चाइल्ड अ‍ॅक्टर नाहीतर बेस्ट अ‍ॅक्टर म्हणून अवार्ड द्या, अशी विनंती दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी यावेळी केली आहे.

Third Party Song: सनीने अभिषेक सिंगसोबत ‘थर्ड पार्टी’ गाण्या मागची सांगितली खास गोष्ट !

पुढे ते म्हणाले की, अ‍ॅक्टर हा अ‍ॅक्टर असतो. तो चाइल्ड अ‍ॅक्टर किंवा सिनियर अ‍ॅक्टर नसतो. अप्रतिम सिनेमा आहे, प्लिज हा सिनेमा पाहा. असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच श्यामची आई हा सिनेमा देखील मी पाहिला. सध्या मराठी सिनेमे काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न करत आहेत. माझी प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की, तुम्ही सरसगड मराठी सिनेमा पाहिला पाहिजे, पण ज्या वेळेला एखादा चांगला सिनेमा येतो. त्यावेळेस त्याना आवर्जून सपोर्ट करा. आणि खरंच हा सिनेमा बघून मला खूप गर्व वाटला आहे. एक मराठी सिनेमा असा बनला आहे. आणि तो हिंदीमध्ये आवर्जून डफ करा, अशी विनंती त्यांनी आपल्या व्हिडिओतून सर्वांना केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube