Nagraj Manjule Naal 2: नागराज मंजुळेंच्या ‘नाळ 2’मधील नवं धमाकेदार गाणं प्रदर्शित

Nagraj Manjule Naal 2: नागराज मंजुळेंच्या ‘नाळ 2’मधील नवं धमाकेदार गाणं प्रदर्शित

Nagraj Manjule Naal 2 Song Release: नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) ‘नाळ 2’ (Naal 2) या मराठी सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमातील ‘भिंगोरी’ (Bhingori) हे गाणं गेल्या काही दिवसांपूर्वी चाहत्यांच्या भेटीला आलं होतं. आता या मराठी सिनेमातील ‘डराव डराव’ (Darav Darav) हे दुसरं धमाकेदार गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं आहे.

सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ 2’मधील ‘डराव डराव’ गाणे ऐकले का? अर्थात हे बच्चे कंपनीवर चित्रित करण्यात आले आहे, हे गाणे मोठ्यांना देखील आवडेल असे आहे. चैतू, चिमू आणि मणी यांची धमाल असलेल्या या गाण्याचे बोल वैभव देशमुख यांचे असून या गाण्याला ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांनी संगीत दिल्याची माहिती समोर आली आहे. तर या धमाकेदार गाण्याला जयेश खरे आणि मास्टर अवन यांचा आवाज लाभला आहे.

‘नाळ’ या सिनेमातील गाण्यांनी प्रेक्षकांना चांगलेच वेड लावले होते. आता ‘नाळ 2’ मधील गाणीही प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत असल्याचे बघायला मिळत आहे. या गाण्याची एक खास खासियत म्हणजे या गाण्याला लाभलेला नवोदित गायकाचा आवाज. मुळात नागराज मंजुळे हे आपल्या सिनेमांमध्ये नेहमीच नवोदितांना संधी देत असताना बघायला मिळत असतात, आणि हे कलाकार या संधीचे सोने करतात. सारेगमपमध्ये जयेश स्पर्धक आहे आणि तिथेच या सर्वांनी त्याला घेरले आहे. खरं तर जयेश खरेने कमी कालावधी मध्येच स्वतःची एक अनोखी अशी ओळख निर्माण केली आहे.

‘डराव डराव’ या गाण्यात विशेष लक्ष वेधून घेत आहे, ती चिमुकली चिमू. एवढीशी गोड मुलगी तिच्या भावंडांसोबत जोरदार धमाल करत असल्याचे बघायला मिळत आहेत. तिच्यातील हा गोडवा, निरागसता भावणारी आहे. ‘आई मला खेळायला जायचंय’ सारखेच हे गाणे देखील चाहत्यांना बालपणात रमवेल. आता या गाण्यामुळे ‘नाळ 2’ या मराठी सिनेमाची उत्सुकता खूपच वाढली आहे. ‘नाळ 2’ हा सिनेमा 10 नोव्हेंबर 2023 दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Jhimma 2: मनोरंजनाच्या सप्तरंगांची उधळण करणारा चित्रपट झिम्मा-2चा जबरदस्त टीझर रिलीज

‘नाळ 2’मधील गाण्याबद्दल बोलत असताना नागराज मंजुळे म्हणाले की,”आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांच्यात कला दडलेली असते. अनेकवेळा ती आपल्या नजरेत येत नाही. त्यामुळे मी अशा कलाकारांना नेहमीच संधी देत असतो. त्यांना प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न करत असतो. खर तर आजवर माझी ही निवड कायम योग्य ठरली आहे. अर्थात हे त्या कलाकारांचे यश. जयेश खरे त्यातलाच एक कलाकार. जयेशच्या आवाजात जादू आहे, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्याच्या या जादुई आवाजाने या धमाकेदार गाण्यातून देखील भावना व्यक्त होत असल्याचे बघायला मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube