Katrina Kaif: कतरिना कैफ ठरली प्रसिद्ध वॉच ब्रँड ‘राडोची’ ग्लोबल ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

Katrina Kaif: कतरिना कैफ ठरली प्रसिद्ध वॉच ब्रँड ‘राडोची’ ग्लोबल ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

Katrina Kaif: कतरिना कैफ ही बॉलीवूडची (Bollywood) ल्युमिनरी आणि स्टाइल मॅवेन आणि राडोची जागतिक ब्रँड अ‍ॅम्बेसेडर (Rado Brand Ambassador) ठरली आहे. नुकतीच याची घोषणा झाली असून नाविन्यपूर्ण आणि टिकाऊ डिझाइन्स तयार करण्याच्या अग्रगण्य प्रसिद्ध स्विस घड्याळ निर्माता म्हणून हा ब्रँड प्रसिद्ध आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rado (@rado)


तिच्या ग्रेस आणि फॅशन-(fashion) फॉरवर्ड स्टाइलसाठी प्रसिद्ध असलेली कतरिना कैफ राडोच्या फॅशन आणि इनोव्हेशनच्या फ्यूजनसह नक्कीच काहीतरी नवं करणार यात शंका नाही. ही भागीदारी जागतिक स्तरावर बॉलीवूड स्टार्सचा वाढता प्रभाव निर्माण करत आहे. कतरिनाचे आंतरराष्ट्रीय आकर्षण आणि चाहता वर्ग विविध बाजारपेठांमध्ये Rado ची ओळख नक्कीच वाढवणार आहे.

कतरिना कैफनेही या सहकार्याबद्दल तिची उत्सुकता व्यक्त करत असताना, “राडो, घड्याळनिर्मितीतील उत्कृष्टतेसाठी ओळखल्या जाणार्‍या ब्रँडशी निगडीत असल्याचा मला आनंद वाटतो. राडो घड्याळे त्यांच्या नाविन्यपूर्ण डिझाईन्सने आणि गुणवत्तेशी बांधिलकीने मला नेहमीच आकर्षित करतात. जागतिक व्यासपीठावर या प्रतिष्ठित स्विस ब्रँडचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी उत्सुक आहे.

Jaybhim Panther: ‘जयभीम पँथर’ एक संघर्ष नवा मराठी सिनेमा लवकरच

Rado ची ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कतरिना कैफ ब्रँड चा चेहरा बनली तर आहे. चाहत्यांचा लाडका सलमान खानच्या आगामी ‘टायगर 3’ (Tiger 3) या सिनेमात हटके अंदाजात कतरिना कैफ चाहत्यांना बघायला मिळणार आहे. या सिनेमाची चांगलीच उत्सुकता लागली आहे. भाईजानच्या ‘टायगर 3’ सिनेमाची गेल्या काही दिवसापासून चांगलीच चर्चा रंगत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube