Bollywood Atress : लाइट्स, कॅमेरा, अॅक्शन! सिल्व्हर स्क्रीनच नाही बिजनेसमध्येही चमकल्या ‘या’ 6 अभिनेत्री

Bollywood Atress : लाइट्स, कॅमेरा, अॅक्शन! सिल्व्हर स्क्रीनच नाही बिजनेसमध्येही चमकल्या ‘या’ 6 अभिनेत्री

Bollywood Actress : बॉलिवूड ज्याला भारतीय प्रेक्षकांचं ह्रदय मानलं जातं. ते आता केवळ अभिनय आणि झगमागाटापूरत मर्यादित राहिलेलं नाही. गेल्या काही वर्षात अनेक प्रतिभावान अभिनेत्रींनी (Bollywood Actress) व्यावसायात देखील पाऊल ठेवलं आहे. ज्यामुळे हे सिद्ध झालं की, या अभिनेत्री केवळ अभिनय नाही तर इतर क्षेत्रातही माहिर आहेत. त्यामुळे पाहूयात यामध्ये कोणत्या अभिनेत्री आहेत ज्यांनी आपला व्यावसाय सुरू केला आहे. त्यात यश मिळवलं.

आलिया भट :
आलिया भट एक अशी अभिनेत्री आहे. जी तिच्या वैविध्यपूर्ण प्रतिभेसाठी ओळखली जाते. एक उद्योजक म्हणून देखील ती कुशल आहे. ती इटरनल सनशाईन प्रोडक्शन्सची भागीदार आहे. जे एक प्रोडक्शन हाऊस आहे. ज्यांनी डार्लिंग्स आणि गंगूबाई काठियावाडी यांसारखे सुपरहीट चित्रपट दिले आहेत. तसेच ती फॅशनच्या जगतात देखील काम करते. तिचा एडामामा हा ब्रॅन्ड तिने लॉन्च केला आहे. जो लहान बालक आणि मातांना लागणाऱ्या वस्तू निर्माण करतात. त्यामुळे ती अनेकींना प्रेरणा देणारं काम करते.

ऋचा चढ्ढा :
ऋचा चढ्ढा दमदार कलाकार तर आहेच तसेच तिने तिचं प्रोडक्शन हाऊस देखील सुरू केले आहे. तिने तिच्या पतीसह पुशिंग बटन्, स्टुडीओची स्थापना केली आहे. तसेच तिचं पहिलं प्रोडक्शन हाऊस ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ देखील उत्कृष्ट कंटेंट निर्मितीसाठी ओळखलं जात होतं. तिच्यासाठी करिअरच्या सुरूवातीला प्रोडक्शनमध्ये जाणं आव्हान होतं. कारण इतर लोक करिअरनंतर याकडे वळतात.

दीपिका पदुकोन :
दीपिका पदुकोनचा देखील एक अभिनेत्री ते उद्योजिका हा प्रवास उल्लेखनीय आहे. नुकतचं तिने तिचा स्किन केअर ब्रॅंन्ड ’82 ई’ लॉन्च केला आहे. जो बाजारात प्रसिद्ध आहे. त्यासाठी सोशल मीडियावर तिने शाहरूख खान आणि रणवीर सिंहला या ब्रॅंन्डच्या जाहिरातीसाठी घेतल्याने तो चर्चेत आला आहे. तसेच तिने लोकप्रिय कॉफी ब्रॅंन्ड ब्लू टोकाईमध्ये गुंतवणुकीचा घोषणा केली आहे.

कॅटरिना कैफ :
कॅटरिना कैफ जी तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. तर आता ती मेकअप आणि स्किन केअर ब्रॅंन्ड ‘के ब्यूटी’ ची भागीदार आहे. या ब्रॅंन्डला सौंदर्यप्रेमींचा प्रतिसाद मिळत आहे. तसेच तिने एका अभिनेत्रीसह एक यशस्वी उद्योजिका म्हणून देखील आपलं स्थान निर्माण केलं आहे.

नेहा धुपिया :
नेहा धुपिया ही अभिनेत्री देखील मनोरंजन आणि उद्योग क्षेत्रात ऑलराऊंडर आहे. एक मॉडल, पेजेंट विजेती, अभिनेत्री आणि निर्माती म्हणून ती नेहमीच चमकत आली आहे. तिची ‘बिग गर्ल प्रोडक्शन’ ही प्रोडक्शन कंपनी आहे. तसेच तिचा ‘#NoFilterNeha’ हा प्रसिद्ध पॉडकास्ट शो आहे. तर तिचा ‘फ्रिडम टू फीड’ हा उपक्रम माताना स्तनपान आणि पालन-पोषणासाठी सक्षम करतो.

प्रियंका चोप्रा :
प्रियंका चोप्रा एक जागतिग फॅशन आयकॉन आहे. तिने विविध क्षेत्रांत यशस्वी पाऊल ठेवलं आहे. ती हेअर केअर ब्रॅंन्ड ‘एनोमली’ची मालक आहे. तसेच ती लक्झरी डिनर वेअर ब्रॅंन्ड ‘सोना होम’ची व्यवस्थापक आहे. अभिनयासह तिचं विविध क्षेत्रामधील हे कार्य तीचं व्यावसायिक कौशल्य दाखवते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube