Rohit Sharma : मुंबई इंडियन्सने रोहितचं कर्णधारपद का काढलं ? उत्तर मिळालंच..

Rohit Sharma : मुंबई इंडियन्सने रोहितचं कर्णधारपद का काढलं ? उत्तर मिळालंच..

Rohit Sharma : इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) मोठा उलटफेर केला आहे. आता रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबईचा कर्णधार बनवण्यात आला आहे. याबाबत मुंबई इंडियन्सने अधिकृत घोषणा केली आहे. आयपीएल 2024 पूर्वी मुंबईने पांड्याचा ट्रेड केला होता. पांड्या याआधी गुजरात टायटन्सकडून खेळत होता. पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातही चॅम्पियन झाला. हार्दिकच्या पुनरागमनामुळे त्याच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्सच्या या निर्णयामुळे चाहत्यांत मोठी नाराजी पसरली आहे. याचा मोठा धक्का आता मुंबई इंडियन्सला बसला आहे. अनेक क्रीडप्रेमींनी मुंबई इंडियन्सचं अधिकृत पेज अनफॉलो केल्याची माहिती आहे. रोहित शर्मासारख्या चांगल्या खेळाडूचे कर्णधारपद काढून त्याच्याजागी हार्दिकलाच का कर्णधार केलं असा प्रश्न अनेकांना पडला होता. या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे.

यामागे अनेक कारणी आहेत. एकतर मागील अनेक दिवसांपासून रोहित शर्मा टी 20 सामने खेळलेला नाही. मागील आयपीएलनंतर त्याने एकही टी 20 सामना खेळलेला नाही. जर तो टी 20 सामनेच खेळत नसेल तर त्याला कर्णधारपद कसे द्यायचे असा प्रश्न होता. दुसरे म्हणजे, रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स पाचवेळा आयपीएल विजेता ठरला. पण, मागील तीन वर्षात संघाची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली. त्यामुळे संघात बदल करण्याची गरज निर्माण झाली होती.

Hardik Pandya : टीम इंडियाला धक्का! हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर; ‘या’ खेळाडूची एन्ट्री

त्यानंतर आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे, क्रिकेटट्या सगळ्याच प्रकारात रोहित शर्मा सातत्याने अपयशी ठरत आहे. कदाचित हा त्याच्या क्रिकेट करिअरचा अखेरचा टप्पा असावा. विश्वचषकात सुरुवातीला चांगली कामगिरी केल्यानंतर अखेरच्या सामन्यात अतिशय खराब कामगिरी संघाने केली. त्यावेळीही रोहित शर्माच कर्णधार होता. रोहित शर्माही या सामन्यात फ्लॉप ठरला.

हार्दिकलाच का कर्णधार केलं ?

रोहितच्या तुलनेत कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची कामगिरी चांगली राहिली आहे. तो एक चाणाक्ष कर्णधार आहे.  मागील दोन हंगामात हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स अंतिम फेरीत पोहोचला होता. हार्दिक पांड्या भारताच्या टी 20 संघाचा कर्णधार आहे. तसेच आगामी टी 20 विश्वचषकातही हार्दिक पांड्याच टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. या गोष्टींचा विचार करून कदाचित हार्दिकला मुंबई इंडियन्सने कर्णधार म्हणून नियुक्त केलं असावं अशी चर्चा आता सुरू आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube