Hardik Pandya : टीम इंडियाला धक्का! हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर; ‘या’ खेळाडूची एन्ट्री
Hardik Pandya : विश्वचषकात जबरदस्त कामगिरी (World Cup 2023) करणाऱ्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा कमबॅक करेल ही शक्यता आता मावळली आहे. हार्दिक पांड्या 2023 त्या वनडे क्रिकेट विश्वचषकातून बाहेर पडला आहे. बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात हार्दिकच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. या दुखापतीतून लवकर बरा होऊन तो संघात पुनरागमन करेल. सेमी फायनलच्या सामन्यात खेळताना दिसेल असा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. मात्र, हा दावाही आता फोल ठरला आहे. हार्दिक ऐवजी प्रसिद्ध कृष्णा याला संघात घेण्यात आले आहे.
India's star all-rounder to miss the remainder of #CWC23.
Details 👇https://t.co/oE1Fh9e5hG
— ICC (@ICC) November 4, 2023
बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिकच्या पायाला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो संघाबाहेर होता. बंगळुरू येथील अॅकॅडमीत त्याच्यावर उपचार सुरू होते. या दुखापतीतून सावरून हार्दिक पांड्या सेमी फायनलच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे असे सांगितले जात होते. मात्र, तसे काही झाले नाही. हार्दिक पांड्याची जागी प्रसिध कृष्णाची संघात निवड करण्यात आली आहे. या बदलाला शनिवारी विश्वचषकाच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीने मान्यता दिल्याचे आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे.
प्रसिद्ध कृष्णाला विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धांत खेळण्याचा अनुभव नाही. त्याला बॅकअप म्हणून तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. आता प्रसिद्ध कशी कामगिरी करणारे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आता हार्दिक कमबॅक करणार नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हार्दिकचा विचार न करता रोहित शर्माला पुढील सामन्यांसाठी गेमप्लॅन तयार करावा लागणार आहे. भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. साखळी फेरीतील आणखी दोन सामने बाकी आहेत. टीम इंडियाचा पुढील सामना 5 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेबरोबर होणार आहे. त्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी नेदरलँड्स विरोधात सामना आहे.
Rishabh Pant : ऋषभ पंत वर्ल्डकप खेळणार का? टीम इंडियातील कमबॅकचा अपडेट मिळाला
रोहित शर्माच्या कप्तानीत संघ जोरदार कामगिरी करत आहे. संघ गुणतालिकेत टॉपवर आहे. रोहित शर्मा जे काही निर्णय घेत आहे ते यशस्वी ठरत आहेत. मात्र तरीही काही ठिकाणी रोहित शर्मापुढे अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यात हार्दिक पांड्या संघाबाहेर गेल्याने पहिली अडचण निर्माण झाली आहे.
ऋषभ पंतही संघाबाहेर
ऋषभ पंत दुखापतीतून हळूहळू सावरत असून त्याने क्रिकेटचा सराव पुन्हा सुरू केला आहे. या वर्षाच्या अखेरीस किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला तो टीम इंडियात (Team India) पुनरागमन करेल, अशी शक्यता आहे. ऋषभ पंतच्या कारचा मागील वर्षात अपघात झाला होता. या अपघातात तो जखमी झाला होता. पंत सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करत आहे. बऱ्याच दिवसांपासून तो याच ठिकाणी आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या काही जाहिरातीत पंत दिसला होता. त्यामुळे तो आता लवकरच क्रिकेटमध्ये वापसी करेल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.