रिलीजच्या तिसऱ्या दिवशी दणक्यात आपटला ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’, शाहीदचा सिनेमा डब्बागुल?

रिलीजच्या तिसऱ्या दिवशी दणक्यात आपटला ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’, शाहीदचा सिनेमा डब्बागुल?

Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya Box Office Collection Day 3: 2024 हे वर्ष हिंदी प्रेक्षकांसाठी काही खास जाणार नाही. 2023 मध्ये शाहरुख खानने (Shah Rukh Khan) वर्षाची सुरुवात अशी धमाकेदार केली होती, याचे वर्षभर पडसाद उमटत होते. परंतु 2024 हे वर्ष अनेक बाबतीत थंडावलेले दिसते. याचाच अर्थ असा की रसिकांना अद्याप असा एकही चित्रपट सापडलेला नाही, की ज्यासाठी चित्रपटगृहांमध्ये रांग लागली असेल. साऊथच्या बड्या स्टार्सचे सिनेमे रिलीज झाले आहेत पण त्यांची फारशी क्रेझ दिसत नाही. बॉलीवूड चित्रपटांचीही क्रेझ दिसत नाही.

शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ (Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस(box office) कलेक्शनचे ताजे आकडे समोर आले आहेत. शाहिद कपूर चाहत्यांचा लाडका असून त्याचे रोमँटिक चित्रपट नेहमीच पसंत केले जातात. मात्र अलीकडच्या काळात हैदर, उडता पंजाब आणि पद्मावत यांसारख्या चित्रपटातून त्यांनी ही प्रतिमा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. त्याने 2024 वर्षाची सुरुवात केवळ रोमँटिक चित्रपटाने केली. मात्र त्याची रोमँटिक शैली चाहत्यांना पसंत पडत नसल्याचे दिसून येत आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री क्रिती सेननसोबत (Kriti Sanon) आलेल्या ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ (Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya) या त्याच्या चित्रपटाची कमाई हेच दाखवते. चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले आहेत. वीकेंडचा फायदा चित्रपटाला झाला आहे. चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास, सॅकनिल्कच्या मते, रिलीजच्या पहिल्या दिवशी त्याने 6.70 कोटी रुपये कमवले होते. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 9.65 कोटींची कमाई केली होती.

पहिल्या आठवड्यातच लाल सलामची बॉक्स ऑफिसवर हालत खराब, अ‍ॅक्शन रसिकांच्या अपेक्षा धुळीस

तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाच्या कमाईत थोडीशी वाढ झाली आहे. तिसऱ्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन 10.50 कोटी रुपये होते. या अर्थाने चित्रपटाने रिलीजच्या 3 दिवसांत 26.85 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाच्या या कलेक्शनला फार चांगले किंवा वाईट म्हणता येणार नाही. हा चित्रपट सरासरी वेगाने पुढे जात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना शाह यांनी केले आहे. चित्रपटातील गाण्यांनाही पसंती दिली जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज