पहिल्या आठवड्यातच लाल सलामची बॉक्स ऑफिसवर हालत खराब, अॅक्शन रसिकांच्या अपेक्षा धुळीस
Lal Salaam Box Office Collection Day 3: ऐश्वर्या (Aishwarya) रजनीकांत (Rajinikanth) दिग्दर्शित ‘लाल सलाम’ (Lal Salaam Movie) शुक्रवारी (9 फेब्रुवारी) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. रजनीकांतने विष्णू विशाल आणि विक्रांत (Vikrant) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या स्पोर्ट्स ड्रामामध्ये एक विस्तारित कॅमिओ केला आहे. चित्रपटाची ओपनिंग थंड असताना वीकेंडलाही चित्रपटाच्या कमाईत कोणतीही मोठी झेप झालेली नाही. ‘लाल सलाम’ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे पहिल्या रविवारी किती कोटींचा गल्ला जमवला चला तर मग जाणून घेऊया?
‘लाल सलाम’ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी किती कमाई केली? 2023 मध्ये ब्लॉकबस्टर चित्रपट जेलर दिल्यानंतर, थलायवा म्हणजेच रजनीकांत (Rajinikanth) यांनी 2024 मध्ये ‘लाल सलाम’ द्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. या चित्रपटात रजनीकांत यांनी छोटी भूमिका साकारली असली तरी चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, आता हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून, बॉक्स ऑफिसवर (box office) त्याची कामगिरी फारशी दिसत नाहीये. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, ‘लाल सलाम’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 3.55 कोटींचा व्यवसाय केला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी या चित्रपटाने 3.25 कोटींची कमाई केली. आता, ‘लाल सलाम’ रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारच्या कमाईचे आकडे आले आहेत जे खूपच निराशाजनक आहेत.
Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘लाल सलाम’ ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी फक्त 3 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह ‘लाल सलाम’ची तीन दिवसांची कमाई 9.70 कोटींवर पोहोचली आहे. ‘लाल सलाम’ तीन दिवसात 10 कोटींची कमाई करू शकला नाही. ‘लाल सलाम’च्या कमाईचा वेग खूपच कमी आहे. प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटाविषयी बरीच चर्चा होती पण मोठ्या पडद्यावर आल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यासोबतच रजनीकांतचा चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस उलटूनही 10 कोटींचा आकडा पार करू शकलेला नाही.
Prajakta Mali: प्राजक्ता माळीने काढलीये खास मित्रमंडळात “भिशी”
‘लाल सलाम’ हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट : ‘लाल सलाम’ हा एक क्रिकेट ड्रामा चित्रपट आहे, जो ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित आहे, जो धार्मिक एकतेचे महत्त्व दर्शवतो. रजनीकांतने त्यांची मुलगी ऐश्वर्या दिग्दर्शित कमबॅक चित्रपटात सुमारे 45 मिनिटांची छोटी भूमिका साकारली आहे. विष्णू विशाल आणि विक्रांत यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेत आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. या चित्रपटाला ए आर रहमानचे प्रभावी संगीत देखील आहे.