Dharmaveer 2 च्या कमाईत जबरदस्त वाढ! अवघ्या तीन दिवसात गाठला मोठा टप्पा

Dharmaveer 2 च्या कमाईत जबरदस्त वाढ! अवघ्या तीन दिवसात गाठला मोठा टप्पा

Dharmveer 2 Movie Box Office Collection Day 3 : ‘धर्मवीर’ चित्रपटानंतर याच्या सीक्वलच्या चाहते प्रतिक्षेत होते. अखेर 27 सप्टेंबरला ‘धर्मवीर 2 : साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट’ (Dharmveer 2 Movie) सिनेमा प्रदर्शित झाला. (Marathi Movie) धर्मवीर प्रमाणेच त्याच्या सीक्वलला देखील प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रसाद ओक मुख्य भूमिकेत असलेल्या ‘धर्मवीर 2’ चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे. (Box Office Collection ) या चित्रपटाने शो सगळीकडे हाऊसफूल होत आहेत. तर ‘धर्मवीर 2’ पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करत आहेत. चला तर मग ‘धर्मवीर 2’चं तीन दिवसांचं बॉक्स ऑफिस कमाई किती झाली जाणून घ्या…

 

View this post on Instagram

 

A post shared by LetsUpp Marathi (@letsupp.marathi)


‘धर्मवीर 2 ‘ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवरील मराठी चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला. प्रदर्शित होताच चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. ‘धर्मवीर 2 ‘ चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी तब्बल 1.92 कोटींचा गल्ला जमवला. 2024 या वर्षातील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ‘धर्मवीर 2’ मराठी चित्रपट ठरला. त्यानंतर वीकेंडलाही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 2.35 कोटींची कमाई केली.

तिसऱ्या दिवशीही ‘धर्मवीर 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. अवघ्या तीनच दिवसांत प्रसाद ओकच्या ‘धर्मवीर 2’ चित्रपटाने देशात 7.92 कोटींचा गल्ला कमावला आहे. आता ‘धर्मवीर 2’ चित्रपट कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड रचतो का, हे पाहणं मोठ्या औत्सुक्याचं असणार आहे.

Dharmaveer 2 : ‘धर्मवीर 3’मध्ये काय असेल? प्रसाद ओक स्पष्टच बोलला, म्हणाला- ‘लोकांना वाटतं…’

‘धर्मवीर 2’ चित्रपटात प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातून आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रविण तरडेंनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात प्रसाद ओकबरोबर क्षितीश दाते, स्नेहल तरडे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube