Marathi Movie: विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय, ‘या’ दोन चित्रपटामुळे वारं फिरणार?

Marathi Movie: विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय, ‘या’ दोन चित्रपटामुळे वारं फिरणार?

Yek Number And Dharmaveer 2 Movie: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत मोठं बंड पुकारलं. त्यामुळे शिवसेना पक्षामध्ये दोन गट पडले. शिवसेनेत या बंडापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा दावा केला. ( Marathi Movie) तर दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा चेहरा ‘येक नंबर’ (Yek Number) सिनेमाच्या पोस्टरवर वापरलेला दिसत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी रुपेरी पडद्यावर काही पडसाद उमटताना पाहायला मिळणार आहेत.

‘येक नंबर’ बदलणार मराठी चित्रपटांची रूपरेषा

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये चित्रपटाचा नायक धैर्य घोलप एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळत असून, त्याच्या देहबोलीतूनच मनातील क्रोध व्यक्त होत आहे. याव्यतिरिक्त या पोस्टरमध्ये लक्षवेधी ठरत आहे, ती एक करारी नजर, जी महाराष्ट्राच्या परिचयाची आहे. या सगळ्यात अधिक भर घालत आहे, ते गूढ, रहस्यमयी संगीत. त्यामुळे या सगळ्यामागे नेमके काय दडले आहे, हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. तेजस्विनी पंडित आणि वरदा साजिद नाडियाडवाला ह्या ‘येक नंबर’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. तर या चित्रपटाला, मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीला आपल्या संगीतावर ठेका धरायला लावणारे, अजय -अतुल यांचे धमाकेदार संगीत लाभले आहे. या चित्रपटाच्या छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini 🕊️🧿 (@tejaswini_pandit)


धर्मवीर -2 मध्ये काय काय असेल?

पहिल्या पार्टमध्ये काही बंधने होती त्या बंधनांमुळे ‘धर्मवीर आनंद दिघें’ना संजय राऊत आणि मंडळी कसा त्रास द्यायची, कशा पद्धतीने ते दिघेंचा दुस्वास करायचे, कशा पद्धतीने दिघेंचे खच्चीकरण करायचे ते दाखविता आले नव्हते. दिघे गेल्यानंतर एकच प्रश्न विचारला गेला की त्यांची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे आणि हे यामध्ये समोर येणार आहे. पहिल्या पार्टमध्ये बंधने होती. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमुळे दिघेंना जो टाडा लागला तो केवळ राऊतांच्या लोकप्रभातील लेखामुळे लागला, ते लोकांसमोर येणार असल्याचे बोलले जात आहे.

Dharmveer 2: सज्ज व्हा! शिवसेनेचा वाघ परत येतोय ‘धर्मवीर 2’ ची नवीन रिलीज डेट जाहीर

प्रसाद ओक ‘धर्मवीर 2’च्या मुख्य भूमिकेत

प्रसाद ओक म्हणाला की,”आनंद दिघे यांचे वेगवेगळे पैलू आहेत. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने दिघे साहेब दिसलेले आहेत. समाजकार्य करताना, लहान मुलांसोबत वेळ घालवताना प्रत्येक वेळेला वेगळ्या रुपात ते दिसले आहेत. आता त्यांचं हे रूप वेगवेगळ्याप्रकारे चितारण्याचं कौशल्य प्रवीणकडे आहे. ‘धर्मवीर 2’च्या वेळेला जबाबदारी वाढली आहे. या सिनेमाचा तिसरा भाग आला तर जबाबदारी आणखी वाढणार आहे”.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube