ज्याची काळजी होती ते घडलंच, रजनीकांतच्या मुलीचा संसार मोडला; कोर्टाचा निर्णय
Rajinikanth Daughter Divorce : दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांच्याही वाट्याला दुःखाचा योग आला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या यांचा अधिकृत घटस्फोट झाला आहे. चेन्नईतील न्यायालयाने बुधवारी दोघांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. ऐश्वर्या आणि धनुष यांनी तब्बल 20 वर्षे वैवाहिक जीवन व्यतित केलं. यानंतर मात्र त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. तामिळनाडूतील कौटुंबिक न्यायालयाने अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली.
Rajinikanth: 33 वर्षांनंतर पुन्हा एकदा मणिरत्नम- रजनीकांतची जादू मोठ्या पडद्यावर!
घटस्फोटासाठी दोघांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परस्पर सहमतीने दोघे विभक्त होऊ इच्छित होते. त्यांच्या अर्जावर अखेर चेन्नईतील फॅमिला कोर्टाने मंजुरी दिली आहे. या खटल्याची सुनावणी याआधीही तीन वेळा झाली होती. या दरम्यान दोघेही हजर नव्हते. नंतर मात्र ऐश्वर्या कोर्टात हजर राहिली. नंतर 27 नोव्हेंबर या दिवशी सुनावणी निश्चित करण्यात आली होती.
दोन वर्षांपूर्वीच दोघांनी एकमेकांपासून वेगळे होणार असल्याची घोषणा केली होती. 2022 मध्ये धनुषने एक सोशल मीडिया पोस्ट केली होती. 18 वर्षांपर्यंत मैत्री, कपल, पॅरेंट्स आणि एकमेकांचे शुभचिंतकाच्या भूमिकेत आम्ही सोबत राहिलो. पण आज आम्ही अशा रस्त्यावर उभे आहोत जिथून आम्ही वेगळे होणार आहोत असे धनुषने या पोस्टमध्ये म्हटले होते. 2004 मध्येच ऐश्वर्या आणि धनुष यांचे लग्न झाले होते. दोघांना दोन मुले देखील आहेत.
धनुष आणि ऐश्वर्या यांची पहिली भेट एका चित्रपटगृहात झाली होती. ऐश्वर्या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी थिएटरमध्ये आली होती. यावेळी धनुषही तेथे होता. सिनेमाच्या मालकाने धनुषची आणि रजनीकांतच्या मुली ऐश्वर्या आणि सौंदर्या यांची ओळख करून दिली. यानंतर दुसऱ्याच दिवशी ऐश्वर्याने धनुषला पुष्पगुच्छासह एक मेसेज पाठवला. यानंतर दोघांची प्रेम कथा सुरू झाली होती.
IIFA 2024: रजनीकांतचा जेलर ठरला सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपट, वाचा विजेत्यांची यादी
पुढे 2004 मध्ये दोघेही विवाह बंधनात अडकले. वीस वर्षांनंतर मात्र दोघेही आता अधिकृतरित्या एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. खरंतर 2022 मध्येच दोघांनी वेगळे होत असल्याचे सांगितले होते. काल मात्र कोर्टाने त्यांचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर करत यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले.