12th Fail: दमदार कमाईनंतर ’12 वी फेल’चा जलवा; ऑस्कर 2024 मध्ये स्वतंत्र प्रवेश

12th Fail: दमदार कमाईनंतर ’12 वी फेल’चा जलवा; ऑस्कर 2024 मध्ये स्वतंत्र प्रवेश

12th Fail : ’12 वी फेल’ (12th Fail) हा सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर (box office) हा सिनेमा मोठा गल्ला कमावत आहे. कमी बजेटच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 45.13 कोटींचं कलेक्शन केले आणि हा सुपरहिट ठरला. 27 ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या सिनेमाचे अद्याप थिएटरमध्ये शो सुरू आहेत.

विक्रांत मेस्सीची (Vikrant Messey) मुख्य भूमिका असलेला ’12 वी फेल’ हा सिनेमा चाहत्यांच्या चांगलच पसंतीस उतरला आहे. प्रमोशन न करता हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला. आपल्या करिअरमध्ये अनेक आयकॉनिक सिनेमे बनवणारे विधू विनोद चोप्रा यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

’12 वी फेल’ या सिनेमाची निर्मिती कमी बजेटमध्ये करण्यात आली आहे. तसेच कमी स्क्रीन्सवर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र तरीदेखील चाहत्यांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला आहे. सर्वत्र या सिनेमाचं तोंडभरून कौतुक करत आहे. ’12 वी फेल’ या सिनेमातील विक्रांतच्या कामाने सर्वांना मोठा धक्का दिला आहे. या सिनेमाची गोष्ट खूपच भावनिक आहे. हा सिनेमा या वर्षातील सुपरहिट सिनेमा ठरला आहे. अजूनही बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा उत्तम कामगिरी करत आहे. आता ऑस्करच्या शर्यतीत सिनेमाचा समावेश झाल्याने या सिनेमाचा गल्ला आणखी वाढला आहे.

Dharmaveer 2: ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर; CM शिंदेच्या उपस्थितीत शुटींगला सुरुवात

’12 वी फेल’ हा सिनेमा 27 ऑक्टोबर 2023 दिवशी चाहत्यांच्या भेटीला आला आहे. विक्रांत मेस्सी आणि मेधा शंकर या सिनेमात मुख्य भूमिकेमध्ये बघायला मिळत आहेत. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 45 कोटींपेक्षा जास्त गल्ला कमावला आहे. अनुराग पाठक यांच्या पुस्तकावर आधारित हा सिनेमा आहे. आयपीएस मनोज कुमार यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा तयार करण्यात आला आहे.

12वी फेलची कथा

12वी फेल सिनेमा अनुराग पाठकच्या याच नावावरील पुस्तकावर आधारीत आहे. यामध्ये विक्रांतसोबत मेधा शंकर, अनंत वी जोशी, अंशुमान पुष्कर आणि प्रियांशु चटर्जी मुख्य भूमिकेमध्ये आहेत. हा सिनेमा एका आयपीएस अधिकाऱ्याची कथा रेखाटण्यात आली आहे, जे 12वीत फेल होते. त्यानंतर त्यांनी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी काम केले आणि सोबत युपीएससीच्या तयारी करत असल्याचे बघायला मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube