Dharmaveer 2: ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर; CM शिंदेच्या उपस्थितीत शुटींगला सुरुवात

Dharmaveer 2: ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर; CM शिंदेच्या उपस्थितीत शुटींगला सुरुवात

Dharmaveer 2 : ‘आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर’ (Dharmaveer) हा मराठी सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी चाहत्यांच्या भेटीला आला होता. या सिनेमाचा गेल्या वर्षी पहिला भाग रिलीज झाला होता. सिनेमाला मिळालेल्या यशानंतर निर्मात्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली. प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर 2’च्या (Dharmaveer 2) शुटिंगला आजपासून ठाण्यात सुरुवात करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Majja (@its.majja)


‘धर्मवीर 2’ सिनेमाच्या शुभरंभाच्या दरम्यान (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,”धर्मवीर स्व.आनंद दिघे यांचे संपूर्ण जीवन जगासमोर आणणाऱ्या टीमचे मनापासून अभिनंदन. पहिल्या भागाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. धर्मवीर स्व.आनंद दिघे यांनी समाजामध्ये सर्व स्तरातील घटकांचे कल्याण केले आहे, ते सर्वांसाठी जगले, गोरगरिबांसाठी स्वतःचे आयुष्य झोकून दिले आहेत. सर्वधर्मसमभाव हा भाव मनामध्ये ठेवून समाजातील प्रत्येक गरजूला नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे, हीच दिघे साहेबांची शिकवण होती, त्याचीच शिकवण आम्ही पुढे घेऊन जात आहोत.

‘मी मुख्यमंत्री झालो यामध्ये दिघे साहेबांचे आशीर्वाद आणि बाळासाहेबांचे विचार आहेत. सत्तेचा वापर सर्वसामान्य नागरिकांसाठी हीच त्यांची शिकवण होती. आणि आम्ही त्याच मार्गावर लढत आहोत. सरकार बनल्यापासून काही लोक सरकार पडणार, अशी टीका देखील करत होते.मात्र आता ज्योतिषी देखील थकले, मुख्यमंत्री बदलणार म्हणतात, 31 डिसेंबर तारीख देत आहेत. परंतु माझ्या पाठीशी आनंद दिघे होते. अयोध्या इथे पहिली चांदीची विट दिघे साहेब यांनीच पाठवली होती, काही लोक म्हणायचे मंदिर वही बनायेंगे तारीख नही बतायेंगे, मात्र मोदींनी मंदिर पण बनवले आणि तारीख पण जाहीर केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)


मंगेश देसाई यांच्या साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेद्वारे “धर्मवीर 2” सिनेमाची निर्मिती करण्यात येणार असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण विट्ठल तरडे निभावणार आहेत. अभिनेता प्रसाद ओक दिघे साहेबांची भूमिका साकारणार असून अन्य कलाकरांची नावे मात्र गुलदसत्यात ठेवण्यात आली आहे. एकंदरीतच “धर्मवीर” सिनेमात कलाकारांची निवड, लेखन-दिग्दर्शन, अभिनय, संगीतासह सर्वच गोष्टी उत्तमप्रकारे जुळून आल्या होत्या. त्यामुळेच आता “धर्मवीर 2″”मध्येही त्याची पुनरावृत्ती होईल, यात शंका नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Dhamaal (@marathidhamaal)


“धर्मवीर 2” सिनेमाच्या पोस्टरवर भगव्या बॅकग्राऊंडवर’धर्मवीर 2′ आणि “साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट….” अशी टॅगलाईन नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट धडाकेबाज पद्धतीने आणि रंजक कथानकाद्वारे हिंदुत्त्वावर भाष्य करणारा असल्याचा प्राथमिक अंदाज बांधता येत आहे. सिनेमात कलाकार कोण असणार? हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र “धर्मवीर 2” या चित्रपटातून साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट चित्रपटातून उलगडली जाणार म्हणजे काय,? हे समजून घेण्यासाठी अजुन थोडी वाट पहावी लागणार असल्याचे निर्माते मंगेश देसाई यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube