Dharmaveer: आनंद दिघे यांच्या जीवनपटाला एक वर्ष पूर्ण! ‘धर्मवीर २’बाबत प्रसाद ओकची खास पोस्ट

Dharmaveer: आनंद दिघे यांच्या जीवनपटाला एक वर्ष पूर्ण! ‘धर्मवीर २’बाबत प्रसाद ओकची खास पोस्ट

Dharmaveer : लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) हा सिनेमा आजही चर्चेत आहे. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांच्या जीवनप्रवास या सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. (Dharmaveer Movie) चाहत्यांनी या सिनेमाला अगदी डोक्यावर उचलून धरले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

गेल्या काही दिवसाअगोदरच या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची देखील घोषणा करण्यात आली. आता प्रसाद ओकने (Prasad Oak ) ‘धर्मवीर’ला एक वर्ष पूर्ण झाल्याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’मध्ये प्रसादने आनंद दिघे यांची अतिशय चांगल्या प्रकारे भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका चाहत्यांना विशेष पसंतीस पडली होती. या सिनेमाच्या शेवटी त्यांचे निधन झाल्याचे देखील दाखविण्यात आले होते.

यामुळे आता या सिनेमाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवले जाणार आहे, याची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. प्रसादही या सिनेमाच्या दुसऱ्या भागासाठी मोठा उत्सुक झाला आहे. ‘धर्मवीर’ सिनेमाच्या तयारीच्या दरम्यानचा मेकिंग व्हिडीओ प्रसादने शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत असताना त्याने सांगितले आहे की, ‘धर्मवीर’ माझ्या आयुष्यातल्या या एका अनोख्या वळणाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे.

Siddharth Jadhav: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनमधील घर कधी पाहिलंय का? सिध्दार्थने शेअर केले फोटो

या सिनेमाने मला जे काही दिले ते शब्दांपलीकडचे आहे. पुन्हा एकदा प्रविण तरडे, मंगेश देसाई, मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील, सचिन नारकर, भट्टे काका, सचिन जोशी, मा. खा. श्रीकांतजी शिंदे आणि मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि धर्मवीरच्या संपूर्ण टीमचे अत्यंत मनःपूर्वक आभार. रसिक प्रेक्षकांचे सुद्धा शतशः आभार. ‘धर्मवीर २’लाही आपले आशीर्वाद आणि प्रेम भरभरून मिळणार अशी आशा करतो. दिघे साहेब असेच कायम पाठीशी राहा.

प्रसादच्या या पोस्टनंतर ‘धर्मवीर २’ची आम्ही वाट बघत आहोत असं चाहत्यांनी देखील त्याला कॉमेंट्स करून सांगितले आहे. या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. या सिनेमाच्या माध्यमातून आनंद दिघेंच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार का? असा सवाल आता चाहत्यांना पडला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube