Box Office Collection : ‘जरा हटके जरा बचके’चा दबदबा, चित्रपटानं पाचव्या दिवशी केली कोटींची कमाई

Box Office Collection : ‘जरा हटके जरा बचके’चा दबदबा, चित्रपटानं पाचव्या दिवशी केली कोटींची कमाई

Box Office Collection :

अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ (Zara Hatke Zara Bachke) या सिनेमाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ओपनिंग वीकेंडला या सिनेमाने मोठी कमाई केली आहे. मात्र सोमवारी आणि आता मंगळवारी सिनेमाच्या कमाईत घट झाली होती. ‘जरा हटके जरा बचके’ने रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी किती कमाई केली? ते आपण जाणून घेणार आहोत. (zara hatke zara bachke box office collection day 5 sara ali khan vicky kaushal movie)

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)


लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘जरा हटके जरा बचके’ या रोमँटिक कॉमेडी सिनेमामध्ये विकी आणि सारा यांनी पहिल्यांदा स्क्रिन शेअर केली आहे. या सिनेमात दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची मोठी पसंती दर्शवली आहे. तरण आदर्श यांनी ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमाने रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (6 जून) 2.27 कोटींची मोठी कमाई केली आहे. आता या सिनेमाची एकूण कमाई 30.60 कोटी एवढी झाली आहे.

जरा हटके जरा बचके’ या सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी (ओपनिंग डे) 5.49 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 7.20 कोटी, तिसऱ्या दिवशी 9.90 कोटी आणि चौथ्या दिवशी 4.14 कोटींची कमाई केली आहे. विकेंडला ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमाने चांगलाच मोठा गल्ला कमावला आहे. एकंदरीत आतापर्यंत या सिनेमाने 26.73 कोटींचा गल्ला कमावला आहे. ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमाची घौडदौड बघता लवकरच हा सिनेमा 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

‘मैं अटल हूँ’ सिनेमाचे शूटिंग सुरु, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता असणार मुख्य भूमिकेत

‘जरा हटके जरा बचके’ (Zara Hatke Zara Bachke) या सिनेमाला चाहत्यांनी देखील भरभरून प्रेम देत आहेत. या सिनेमातील गाणी देखील लोकांना मोठ्या प्रमाणात आवडत आहेत. या सिनेमाची कथा कपिल (विकी कौशल) आणि सौम्या (सारा अली खान) या जोडप्यावर आधारित आहे. दोघे लग्न करतात पण लग्नानंतर त्यांना घरात प्रायव्हसी मिळत नाही. विकी आणि साराबरोबर या सिनेमात राकेश बेदी, शारीब हाश्मी, नीरज सूद या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

2019 मध्ये रिलीज झालेल्या उरी सिनेमानंतर विकीचा एकही सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करु शकला नाही. तर साराच्या लव्ह आजकल, कुली नंबर 1, गॅसलाइट या सिनेमानं प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली नाही. आता त्या दोघांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube