कुणी झाडं तोडायला आले तर, कोरोनात केलं तसं थाळ्या-वाट्या वाजवून हाकलून लावा : सयाजी शिंदे
Sayaji Shide Appel for Bhimashankar पर्यावरणासाठी काम करणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील थेट पत्रकार परीषद घेत नागरिकांना आवाहन केलं आहे.
Sayaji Shide Appel for Bhimashankar Torrent Project cut down trees : कर्जत-भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून महाराष्ट्रात राजकीय आणि पर्यावरणीय वाद पेटला आहे. या प्रकल्पासाठी लाखो झाडांची कत्तल होणार असल्याचा आरोप होत असताना, आता पर्यावरणासाठी काम करणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील थेट पत्रकार परीषद घेत सरकारवर टीका तसेच नागरिकांना आवाहन केलं आहे.
टोरंट प्रकल्पावरून सयाजी शिंदेचं आवाहन
कर्जत-भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पा केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीवर पर्यावरणवादी आक्रमक झाले आहेत. यासाठी थेट या जंगलामध्ये जाऊन निदर्शने केली जात आहेत. यातच आता पर्यावरणासाठी काम करणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील थेट पत्रकार परीषद घेत या प्रकल्पामुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाची यादीच वाचून दाखवली आहे.
महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेला आव्हान ; सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस
यावेळी सयाजी शिंदे यांनी स्थानिक आणि इतर नागरीकांनी आवाहन केले की, ज्या प्रमाणे कोरोनामध्ये नागरिकांनी कोरोनाला पळवून लावण्यासाठी थाळ्या आणि टाळ्या वाजवून कोरोनाला जाण्याचं आवाहन केलं होतं. त्याच प्रमाणे साय डोंगरामध्ये प्रकल्पासाठी काम करणारं जर कुणी झाडं तोडायला आलं तर त्यांनी कोरोनापेक्षाही भयंकर आजार आहे असं समजून हाकलून लावा.
सह्याद्री ही जगातील एक अद्भुत नैसर्गिक देणगी आहे. पशू-पक्ष्यांची निवासस्थाने उद्ध्वस्त करून आणि त्यांच्या घरांवर घाव घालून आपण नेमकं काय मिळवणार आहोत? टोरेंट कंपनीच्या प्रकल्पासाठी यापुढे कर्जत-भीमाशंकर परिसरातील एकही झाड तोडू देणार नाही, असा ठाम निर्धार सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला.