मोठी बातमी! प्रयागराजमध्ये हवाई दलाचे ट्रेनी विमान कोसळले; बचाव कार्य सुरू

Indian Air Force Training Aircraft Crashes :  उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे हवाई दलाचे एक ट्रेनी विमान कोसळले असल्याची माहिती समोर आली आहे

  • Written By: Published:
Indian Air Force Training Aircraft Crashes

Indian Air Force Training Aircraft Crashes :  उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे हवाई दलाचे एक ट्रेनी विमान कोसळले असल्याची माहिती समोर आली आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान प्रयागराजमधील एका तलावात कोसळले. सध्या या ठिकाणी बचाव कार्य सुरु असून दोन्ही वैमानिक सुरक्षित आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या तलावात हवाई दलाचे ट्रेनी विमान कोसळले ते प्रयागराजच्या (Prayagraj) सिव्हिल लाईन्स (Civil Lines) परिसरातील केपी काॅलेजजवळ आहे. अपघातानंतर स्थानिकांनी विमानात अडकलेल्या दोन्ही वैमानिकांना बाहेर काढले. त्यानंतर काही वेळातच हवाई दलाचे अनेक कर्मचारी बचावासाठी हेलिकॉप्टरने पोहोचले आणि पॅराशूटद्वारे तलावात उतरले.

विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान प्रयागराजमधील एका तलावात कोसळल्याने वायू दलाच्या विमानाच्या मोठ्या आवाजामुळे आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली. स्थानिकांनी तलावाकडे धाव घेतली. तलाव उथळ होता, त्यामुळे अधिकाऱ्यांची वाट न पाहता त्यांनी पाण्यात उडी मारली आणि दोन्ही वैमानिकांना वाचवले. दरम्यान, लष्कराचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरु आहे.

भाजपला मोठा धक्का, कल्याण -डोंबिवली महापालिकेत शिवसेना – मनसेचा महापौर

follow us