पुणे अन् अहिल्यानगरमध्ये मुक्काम; मग प्लेनऐवजी ट्रॅव्हल्सनं गाठलं ‘प्रयागराज’; ‘खोक्या’नं सहा दिवसांत काय काय केलं?

पुणे अन् अहिल्यानगरमध्ये मुक्काम; मग प्लेनऐवजी ट्रॅव्हल्सनं गाठलं ‘प्रयागराज’; ‘खोक्या’नं सहा दिवसांत काय काय केलं?

Where Satish Bhosale stay for 6 days: भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा कार्यकर्ता, ज्याला आज सगळा महाराष्ट्र ‘खोक्या’ म्हणून ओळखतोय. तोच सतीश भोसले. त्याला काल प्रयागराजच्या विमानतळावरून अटक केल्याची माहिती मिळतेय. पैशांची उधळण, हेलिकॉप्टर सवारी आणि वेगवेगळ्या रील्समधून सतीश भोसलेचे (Satish Bhosale) कारनामे समोर आलेत. तेव्हापासूनच पोलीस त्याच्या मागावर होते, अखेर त्याला काल बेड्या ठोकल्या. परंतु मधले सहा दिवस सतीश भोसले कुठे गायब होता? हा खोक्या कसा पळाला अन् कुठे कुठे राहिला? हा प्रश्न सर्वांना (Beed Crime) पडतोय. तेच जाणून घेऊ या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून…

हा खोक्या सहापैकी तीन दिवस पुणे (Pune) आणि अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) मुक्कामी असल्याची धक्कादायक माहिती मिळतेय. स्वत:विरोधात दुसरा गुन्हा दाखल होताच खोक्याने घरातून धूम ठोकली अन् थेट पुणं गाठलं. तब्बल दोन दिवस सतीश भोसले पुण्यात मुक्कामी होता. तिसऱ्या दिवशी तो शिरूर कासारमधून माध्यमांसमोर आल्याचं आपण पाहिलंय. परंतु तिसऱ्या दिवशी त्यानी थेट अहिल्यानगरला पळ काढला. तिथं एक दिवस मुक्काम केलाय..त्यानंतर छत्रपती संभाजीनगर गाठून थेट प्रयागराजची (Prayagraj) बस पकडून खोक्या रवाना झाला होता.

शिंदेंचा आमदाराच्या अडचणी वाढल्या, अभिनेत्रीने थेट पोलीस ठाणं गाठलं; धक्कादायक प्रकरण समोर

खोक्या सहा दिवस नेमका कुठे होता?

दुसऱ्या गुन्हा दाखल होताच खोक्याने गाव सोडलं…अन् पुण्याची वाट धरली. तिथे त्याने दोन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी…वेगवेगळ्या हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. नंतर तो शिरूर कासारला पोहोचला अन् माध्यमांसमोर आला. त्यानंतर अहिल्यानगरमध्ये एक दिवसाचा मुक्काम करून तो छत्रपती संभाजीनगरला पोहोचला होता. नंतर ट्रॅव्हल्स पकडून तो उत्तर प्रदेशातील प्रयागराजला (Beed News) पोहोचला. या सगळ्या प्रवासादरम्यान खोक्यासोबत अजून एक व्यक्ती असल्याची माहिती मिळतेय. हा व्यक्ती नेमका कोण होता? असा सवाल देखील उपस्थित होतोय, परंतु अजून यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीये. तर खोक्या प्रयागराजमधून देखील धूम ठोकण्याच्या तयारीत होता. विमानाने जायला निघाला होता, सोबत असलेल्या व्यक्तीला त्याने प्रयागराजलाच ठेवल्याची माहिती मिळतेय.

भोसले पोलिसांच्या तावडीत कसा सापडला?

परंतु प्रयागराजमधून निघत असताना पोलिसांना खोक्याचा नंबर मिळाला अन् लोकेशन ट्रेस करत प्रयागराज पोलिसांच्या मदतीने बीड पोलिसांनी अखेर त्याला पकडलं. फरार झाल्यानंतर सतीश भोसलेने वेगवेगळ्या सहा ठिकाणी मुक्काम केलाय. रोज तो ठिकाणं बदलत राहिला. पोलिसांची पथके त्याच्या मागावर होतीच. या काळात त्याने मोबाईल नंबर देखील बंद केला होता. त्यानंतर त्याने एक नवीन मोबाईल स्वत:कडे ठेवला होता. हाच नवीन नंबर पोलिसांच्या हाती लागला अन् खोक्याला पकडण्यात पोलिसांना यश मिळालं.

“ट्रस्टवर्दी” 2023 काव्यसंग्रहासाठी कृष्ण प्रकाश यांना महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी सुवर्णपदक जाहीर

गळ्यात सोनं, पैशाची उधळण, व्हीआयपी गाड्या अन् बरंच काही

बीड जिल्ह्यात एक नवीन प्रथा पडल्याचं दिसतंय. तिथल्या गुन्हेगारीचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. असाच एक व्हिडिओ 6 मार्च रोजी समोर आला होता. हा व्हिडिओ होता सतीश भोसले नावाच्या व्यक्तीचा. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या गॅंगसोबत एका व्यक्तीला बेदम मारहाण करताना दिसत होता. त्यानंतर हा व्यक्ती फरार झाला. गळ्यात सोनं, पैशाची उधळण, व्हीआयपी वाहने, हेलिकॉप्टरमधून फिरतानाचे खोक्याचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते; परंतु गुन्हा दाखल होताच खोक्याने अंगावरचं सगळंच सोनं काढलं. थेट प्रयागराजला गाठलं. हा खोक्या भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जातंय.

व्हायरल व्हिडिओमुळे खोक्या अडचणीत

सतीश भोसले याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिस बराच काळ त्याच्या मागावर होते. वन विभागाच्या छाप्यादरम्यान, सतीशच्या घरातून अनेक वन्य प्राण्यांचे अवशेष आणि शिकारीचे साहित्य सापडले होते. त्याने बुलढाण्यातील एका व्यक्तीला शिरूरकासार तालुक्यातील बावी येथे अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याच होता, तर लगेच दुसऱ्या दिवशी दिलीप ढाकणे अन् महेश ढाकणे या बाप-लेकाला मारहाण केल्याचा देखील व्हिडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात खोक्यावर दोन गुन्हे दाखल आहेत, तर अखेर या खोक्याला बेड्या ठोकण्यात पोलीसांना यश मिळालंय. याप्रकरणी आता खोक्यामागे नेमका कोणाचा वरदहस्त आहे, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube