आयकर भरण्याची गरज नाही; भारतात ‘हे’ 10 उत्पन्न पूर्णपणे करमुक्त
Tax Free Income : देशातील सर्वसामान्य नागरिक जास्तीत जास्त बचत करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करत असतो. यातच देशात वाढती महागाई
Tax Free Income : देशातील सर्वसामान्य नागरिक जास्तीत जास्त बचत करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करत असतो. यातच देशात वाढती महागाई आणि बदलत्या कर नियमांमुळे देखील उत्पन्नातून जास्तीत जास्त बचत कशी करता येणार यासाठी नवीन नवीन मार्ग शोधणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकारने 10 उत्पन्न पूर्णपणे करमुक्त केले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे या स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर तुम्हाला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही. चला मग जाणून घेऊया 2026 च्या नवीन कर नियमांनुसार कोणते 10 प्रमुख उत्पन्नाचे स्रोत कायदेशीररित्या करमुक्त आहेत आणि तुमची निव्वळ बचत वाढविण्यास मदत करू शकतात.
कृषी उत्पन्न
आपल्या देशात केंद्र सरकार शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कोणताही कर आकारत नाही. तुम्ही पिके विकून किंवा तुमची शेतीची जमीन भाड्याने देऊन उत्पन्न मिळवत असलात तरी ते पूर्णपणे करमुक्त आहे. पण तुमचे पगारासारखे इतर उत्पन्न असेल तर ते कर स्लॅब गणनेत जोडले जाऊ शकते, परंतु कृषी उत्पन्नावर कर शून्य राहतो.
ग्रॅच्युइटी
सलग 5 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ एकाच कंपनीत काम केल्यानंतर मिळालेली ग्रॅच्युइटी देखील सरकारने करमुक्त केलीय. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे. नियमांनुसार, आता खाजगी कर्मचाऱ्यांना 25 लाख रुपयांपर्यंतच्या ग्रॅच्युइटीवर कोणताही कर भरावा लागत नाही. पूर्वी ही मर्यादा 20 लाख रुपये होती.
ईपीएफ आणि पीपीएफ
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि पीपीएफ (PPF), जे सर्वात सुरक्षित निवृत्ती बचत मानले जाते, ते पूर्णपणे करमुक्त आहेत. पीपीएफ व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम दोन्ही करमुक्त आहेत. तसेच 5 वर्षे सतत नोकरी केल्यानंतर ईपीएफमधून पीएफ काढणे करमुक्त करण्यात आलेय.
नातेवाईकांकडून मिळणारे गिफ्ट
लग्नानिमित्त मिळालेल्या गिफ्ट किंवा पालक, भावंडे, जोडीदार यासारख्या जवळच्या नातेवाईकांकडून रोख रक्कम किंवा मालमत्ता पूर्णपणे करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेय. याबाबत कमाल मर्यादा देखील निश्चित करण्यात आलेली नाही.
जीवन विमा मॅच्युरिटी
कलम 10 (10ड) अंतर्गत, जीवन विमा पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कम करमुक्त आहे. मात्र अट अशी आहे की वार्षिक प्रीमियम तुमच्या विमा रकमेच्या 10% पेक्षा जास्त नसावा.
शिष्यवृत्ती आणि पुरस्कार
सरकार किंवा संस्थांकडून शैक्षणिक खर्चासाठी मिळणारी शिष्यवृत्ती पूर्णपणे करमुक्त आहे. शिवाय, पद्म पुरस्कारांसारख्या सरकारने दिलेल्या नागरी सन्मानांसह मिळणारी रक्कम देखील करमुक्त करण्यात आल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आलीय.
भागीदारीतून मिळणारा नफा
जर तुम्ही भागीदारी फर्ममध्ये भागीदार असाल, तर फर्मच्या नफ्यातील तुमचा वाटा करमुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. कारण फर्मने आधीच त्याच्या नफ्यावर कॉर्पोरेट कर भरला असतो.
HUF मधून मिळणारे उत्पन्न
हिंदू अविभाजित कुटुंब (HUF) च्या उत्पन्नातून कुटुंबातील सदस्यांचा वाटा करमुक्त आहे कारण HUF ने आधीच त्या उत्पन्नावर कर भरला आहे.
सरकारी बाँड
सरकार वेळोवेळी पायाभूत सुविधा देणारे बाँड जारी करते, जसे की NHAI आणि REC द्वारे जारी केलेले. या बाँडवर मिळणारे वार्षिक व्याज पूर्णपणे करमुक्त आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, 10 दिवसांत अण्वस्त्र करार झाला नाही तर…
स्वेच्छा निवृत्ती योजना रक्कम
जर तुम्ही निवृत्तीच्या वयाच्या आधी स्वतःच्या इच्छेने निवृत्ती घेतली तर तुम्हाला VRS या योजनेनुसार मिळालेल्या रकमेपैकी 5 लाखांपर्यंतची रक्कम करमुक्त करण्यात आलीय.
