कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 323 जागांसाठी भरती सुरू, महिन्याला ४४ हजार रुपये पगार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 323 जागांसाठी भरती सुरू, महिन्याला ४४ हजार रुपये पगार

UPSC EPFO PA Recruitment 2024 : आज अनेक जण सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात आहे. मात्र, सरकारी नोकरी मिळवणं हे फारच अवघड काम आहे. दरम्यान, सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees Provident Fund) संघटनेने UPSC मार्फत काही रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. त्यानुसार संस्थेत वैयक्तिक सहाय्यक (पीए) पदाच्या एकूण 323 जागा भरण्यात येणार आहेत.

निलेश लंके अजितदादांची साथ सोडणार… शरद पवार म्हणतात, ‘खरं की काय? मला तर माहितीच नाही…’

दरम्यान, इच्छुक आणि पात्र उमेदवार 27 मार्च 2024 (PM 6 PM) पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात, परंतु या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांसाठी वश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया याविषयी माहिती जाणून घेऊ.

एकूण रिक्त जागा- 323

पदाचे नाव
पर्सनल सहाय्यक (PA)

कोण अर्ज करू शकतो?
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी. यासोबतच उमेदवाराला स्टेनो आणि टायपिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
या पदभरतीसाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन : 10 मिनिटे @120 श.प्र.मि. स्टेनोग्राफी (हिंदी/इंग्रजी, ट्रान्सक्रिप्शन: 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी) संगणकावर.

अजित पवारांना पहिला धक्का! आमदार निलेश लंके शरद पवार गटात करणार प्रवेश? 

वयोमर्यादा-
उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे, परंतु SC/ST साठी 05 वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी 03 वर्षे वयाची सूट आहे.

अर्ज फी-
सामान्य/ओबीसी: रु 25
SC/ST/PH/महिला – कोणतेही शुल्क नाही.

उमेदवाराला निवड प्रक्रिया, पगार आणि इतर तपशीलवार माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांनी खालील अधिसूचना वाचावी.

अधिकृत संकेतस्थळ – www.upsconline.mic.in

ऑनलाइन अर्ज करण्यसााठी शेवटची तारीख – २७ मार्च २०१४

अर्ज करण्यास सुरूवात – ७ मार्च २०१४

वेतन- ४४, ९००० (सातवे वेतन स्तर, ०७)

निवड कशी होईल?
या भरतीमध्ये निवड होण्यासाठी उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षेत सहभागी व्हावे लागेल. या टप्प्यात यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना कौशल्य चाचणीत सहभागी व्हावे लागेल. यानंतर उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीला हजर राहावे लागेल. सर्व टप्प्यांतील यशस्वी उमेदवारांना रिक्त पदांवर नियुक्ती दिली जाईल. भरतीशी संबंधित तपशीलवार माहितीसाठी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देणे आणि अधिकृत अधिसूचना पाहणे आवश्यक आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube