अजित पवारांना पहिला धक्का! आमदार निलेश लंके शरद पवार गटात करणार प्रवेश?

अजित पवारांना पहिला धक्का! आमदार निलेश लंके शरद पवार गटात करणार प्रवेश?

अहमदनगर- राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गट आणि अजित पवार गट असे दोन गट तयार झाले. पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अजित पवार गटात राहणे पसंत केले. मात्र आता लोकसभा निवडणुकीपूर्वीच (Lok Sabha Elections) लंके हे अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत असून ते आज ते शरद पवार गटात सामील होणार असल्याचे वृत्त आहे.

स्वप्नील-सई, पूजा-अंकुश ‘या’ सुपरहिट जोड्यानंतर मराठी इंडस्ट्रीत ‘ही’ जोडी ठरतेय चर्चेचा विषय! 

लंके हे नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुक आहे. यातच आता लंके यांनी पवार गटात सामील होत लोकसभेची तुतारी फुकणार याचे स्पष्ट संकेत दिले आहे. काही दिवसांपूर्वीच खासदार अमोल कोल्हे यांचे प्रमुख भूमिका असलेल्या एका महानाट्याच्या माध्यमातून कोल्हे यांनी देखील लंके यांना नगरदक्षिणेतून तुतारी फुंका, असं आवाहन केले होते. नुकताच निलेश लंके यांचा वाढदिवस झाला. त्यानंतरच त्यांनी अजित पवार यांची साथ सोडत शरद पवार गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला, अशी जोरदार चर्चा आहे.

एसबीएसपीच्या प्रदेश सरचिटणीस नंदिनी राजभर यांची हत्या, रक्तबंबाळ अवस्थेत आढळला मृतदेह

शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश? 
लंके आज शरद पवार गटात सामील होणार आहेत. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आता मोठा राजकीय भूकंप होणार आहे. निलेश लंके यांचा पक्षप्रवेश आज शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार असल्याचं बोलल्या जातं आहे.  पुण्यातील कार्यालयात हा पक्ष प्रवेशाचा सोहळा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. आता ते अधिकृतपणे शरद पवार गटात सामील होणार आहेत. त्याचवेळी शरद पवार लंके यांनानगर दक्षिणमधूनही उमेदवारी जाहीर करू शकतात, असं सूत्रांनी सांगितलं.

तर शरद पवार आज माध्यमांशी बोलतांना म्हणाले की,  निलेश लंकेंबाबत मला ठाऊक नाही. ते आमच्या पक्षात येणार आहेत,  ही चर्चा मी तुमच्याकडूनच ऐकली, असं म्हणत त्यांनी लंकेंच्या पक्ष प्रवेशावर भाष्य करण्यास टाळलं.

कोण आहेत निलेश लंके?
निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. ते पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी तीनवेळा निवडून आलेले शिवसेनेचे विजय औटी यांचा पराभव केला होता. दरम्यान, निलेश लंके हे सध्या राष्ट्रवादीत असले तरी त्यांची राजकीय जीवनाची सुरूवात शिवसेनेतून झाली होती. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून काम सुरू केलं होतं.

लोकसभेपूर्वी लंके यांनी हे शरद पवार गटात गेल्यास अजित पवारांना मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळं आगामी निवडणुकीत येत्या काळात लंके विरुद्ध विखे असा लोकसभेचा संघर्ष पाहायला मिळणार हे मात्र नक्की.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube