स्वप्नील-सई, पूजा-अंकुश ‘या’ सुपरहिट जोड्यानंतर मराठी इंडस्ट्रीत ‘ही’ जोडी ठरतेय चर्चेचा विषय!
Shubhankar Tawde and Hruta Durgule On Screen Chemistry: मराठी चित्रपटसृष्टीत अनेक ऑनस्क्रीन जोड्यानी प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. अनेक जोड्या सुपरहिट ठरल्या तर काही फारशा प्रेक्षकांच्या पसंतीस आल्या नाही. (Marathi Movie) सध्या मराठी चित्रपट सृष्टीत एक जोडी जोरदार चर्चेत आहे ती म्हणजे ” शुभंकर तावडे (Shubhankar Tawde) आणि हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ” दोघांच्या अभिनयाची चुणूक त्यांनी दाखवून इंडस्ट्रीत स्वतःच्या वेगळ्या बाजू निर्माण केल्या आहेत. त्यांचा नुकताच एक चित्रपट रिलीज झाला आणि सध्या “कन्नी” (Kanni Movie) मधून प्रेक्षकांची मन जिंकली.
स्वप्नील जोशी- सई ताम्हणकर आणि पूजा सावंत- अंकुश चौधरी यांच्या नंतर मराठी इंडस्ट्रीत शुभंकर – हृता जी जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. इंडस्ट्रीत असे अनेक नवखे कलाकार आहेत ज्यांनी स्वतःच्या अनोख्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं आणि असेच शुभंकर हृता आहेत असं म्हणायला हरकत नाही.
शुभंकर तावडे हा नवा फॅशन आयकॉन ठरतो आहे पण सोबतीने त्यांच्या अभिनयाच्या जादूने त्याने प्रेक्षकांना आपलंसं करून घेतलं आहे. अभिनयातील नावीन्य आणि लालित्य यातून तो उत्तम अभिनय करून सगळ्यांचा फेवरेट ठरतोय. “कन्नी” मधून या दोघांची जोडी सगळ्यांच्या भेटीला आली आणि हा चित्रपट सुपरहिट ठरतोय. शुभंकर आणि हृता हे कायम विविध भूमिका साकारून चर्चेत असतात पण कन्नी त्यांच्या साठी खास ठरून मराठी चित्रपटसृष्टीत बेस्ट जोडी म्हणून हे नावारूपास येतात.
Oscar 2024 : सिलियन मर्फी ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले ख्रिस्तोफर नोलन
या सिनेमातील गाण्याबद्दल दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात,‘यारा रे’ या गाण्यात एक वेगळाच जोश आहे. हे गाणे रेकॉर्डिंग करताना आमच्यातही एक वेगळाच उत्साह होता. हे गाणे ऐकताना कुठेतरी आपणही आपल्या मैत्रीच्या दिवसांमध्ये रमतो. ‘यारा रे’ गाण्याच्या प्रत्येक शब्दामध्ये मैत्रीची व्याख्या दडलेली आहे. त्यामुळे हे गाणे तरुणाईला विशेष जवळचे वाटेल.