Hruta Durgule: या नात्याला दृष्ट न लागो! सासू-सुनेच्या प्रेमळ नात्याचं ऋता दुर्गुळेने उलगडलं गुपित

Hruta Durgule: या नात्याला दृष्ट न लागो! सासू-सुनेच्या प्रेमळ नात्याचं ऋता दुर्गुळेने उलगडलं गुपित

Hruta Durgule: ऋता दुर्गुळे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ऋताने अनेक नाटक मालिका व चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनयाच्या जोरावर ऋताने अल्पावधीतच मनोरंजन विश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. महाराष्ट्राची क्रश असलेली ऋता (Hruta Durgule) सोशल मीडियावर (Social media) प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तिच्या कामाचा चाहत्यांना मोठे कौतुक करत असताना याबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्याने ती चांगलीच चर्चा येत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prateek Shah (@prateekshah1)


गेल्यावर्षी तिने प्रतीक शाहशी (Pratik Shah) लग्नगाठ बांधली. तर आता तिने तिच्या सासूबाईंसोबतचे तिचे नाते कसे आहे, हे उलगडले आहे. तसेच ऋताने १८ मे २०२२ रोजी प्रतीक शाहशी लग्न बंधनात अडकली. प्रतीक दिग्दर्शक (Director) आहे. करिअरच्या शिखरावर असतानाच ऋताने लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत ती अनेकवेळा प्रतीकबद्दल भरभरून सांगितले आहे.

प्रतीक आणि तिच्यात नातं आहे, हे तिने आतापर्यंत खूपवेळा सांगितले आहे. तर आता तिने तिच्या सासूबाईंसोबतच नात्याबद्दल मोठा खुलासा करत ती त्यांच्याशी कसं वागते आणि करिअरमध्ये सासूबाई तिला कसा पाठिंबा देत असतात, याबद्दल तिने सांगितले आहे. ऋता नुकतीच सुलेखा तळवलकरच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. यावेळी बोलत असताना ती म्हणाली की, “इथे मी आहे, म्हणून तुला सगळं हातात आणून देते.

लग्न झाल्यावर तुझं कसं होईल! असं माझी आई मला नेहमी म्हणत असायची. पण माझं नशीब चांगलं आहे की, मला सासू देखील आईसारखीच मिळाली आहे. लग्नानंतर माझा फक्त पत्ता बदला आहे, बाकी काही बदल नाही. लग्नाअगोदर मी आईवर जितका हक्क दाखवला तेवढाच हक्क आता सासूवर देखील गाजवत असते. उद्या मी ७ वाजता निघणार आहे आणि मला हा हा नाश्ता हवा आहे, असं मी अगोदर आईला सांगत असायचे.

Sirf Ek Banda Kafi Hai: मनोज बाजपेयींचा ‘‘सिर्फ एक बंदा..’ सिनेमा लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर

तसंच मी इथे माझ्या सासूबाईंना पण सांगत असते. यामुळे आमच्या दोघीमधील नातं आणखीनच घट्ट झाले आहे. तसेच पुढे ती म्हणाली की, “माझ्या लग्नानंतर मी माझ्याबद्दल आणि कामाबद्दल जास्त कॉन्फिडन्ट झाले होते. माझा आत्मविश्वास आणखी वाढला होता. हे झालं ते फक्त प्रतीक आणि आईंमुळे. त्या खूप मोठी सपोर्ट सिस्टीम माझ्यामागे आहेत. तू अगोदर करिअरचं बघ, बाकी सगळं नंतर, असं त्या मला सांगत असतात. कुठे मिळते अशी सासू! त्या खूप चांगल्या आहेत.” आता ऋताचं हे बोलणं चांगलंच चर्चेत येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube