एसबीएसपीच्या प्रदेश सरचिटणीस नंदिनी राजभर यांची हत्या, रक्तबंबाळ अवस्थेत आढळला मृतदेह

एसबीएसपीच्या प्रदेश सरचिटणीस नंदिनी राजभर यांची हत्या, रक्तबंबाळ अवस्थेत आढळला मृतदेह

Nandini Rajbhar Murder : उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यात सुहेलदेव समाज भारतीय पक्षाच्या 30 वर्षीय महिला नेत्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. नंदिनी राजभर (Nandini Rajbhar) असं हत्या झालेल्या महिला नेत्याचं नावं आहे. त्यांच्या घरातच त्यांचा मृतदेह रक्ताच्या थोरोळ्यात आढऴून आला. दरम्यन, नंदिनी राजभर यांच्या हत्येने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Oscars 2024 : जॉन सीना नग्नावस्थेत पोहोचला ऑस्करच्या मंचावर, सर्वांचं वेधलं लक्ष; पाहा व्हिडिओ 

डिघा गावातील रहिवासी असलेल्या नंदिनी सुहेलदेव या भारतीय समाज पक्षाच्या (सुभासपा) महिला शाखेच्या प्रदेश सरचिटणीस होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी त्या जिल्हा स्टेडियमवर आरएसएसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यानंतर दुपारी दोन वाजता त्या घराकडे रवाना झाल्या. त्यांची हत्या खलीलाबाद कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघा बायपास परिसरात घडली. सायंकाळी 3 ते 4 च्या दरम्यान नंदिनी यांची हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. नंदिनी यांच्या अंगावर चाकूच्या अनेक जखमा आढळल्या. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एएसपी, सीओ आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

Oscars 2024 : जॉन सीना नग्नावस्थेत पोहोचला ऑस्करच्या मंचावर, सर्वांचं वेधलं लक्ष; पाहा व्हिडिओ 

नंदिनी राजभर या त्यांच्या घराच्या खोलीत पलंगाखाली जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत आढळल्या. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून नंदिनी राजभर यांना धमक्या येत होत्या. त्यामुळे त्या तणावात होत्या, असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

नंदिनी यांच्या सासू आरती देवी यांनी सांगितले की, रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता नंदिनीला आवाज दिला होता, मात्र नंदीनी आपल्या खोलतून बाहेर आल्या नाहीत. दरम्यान, आपण नंदीनी यांच्या खोलीत डोकावले असता नंदिनी नंदिनी पलंगाखाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिल्या, त्यांच्या श्वास थांबला होता.

पोलीस अधिकारी कृष्णा भारद्वाज यांनी सांगितले की, नंदिनी राजभर यांची चाकूने हल्ला करून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. 10 दिवसांपूर्वी जमिनीबाबत वाद झाला होता, असं त्यांनी सांगितलं.

नंदिनीचे सासरे रेल्वे रुळांवर मृतावस्थेत आढळले

29 फेब्रुवारी रोजी नंदिनी यांचे सासरेही रेल्वे रुळावर मृतावस्थेत आढळले होते. दरम्यान, पोलीस नंदिनी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करत असल्याचे एसपी सत्यजित गुप्ता यांनी सांगितले. लवकरच आरोपी पकडले जातील.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज