निलेश लंके अजितदादांची साथ सोडणार… शरद पवार म्हणतात, ‘खरं की काय? मला तर माहितीच नाही…’

निलेश लंके अजितदादांची साथ सोडणार… शरद पवार म्हणतात, ‘खरं की काय? मला तर माहितीच नाही…’

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे पक्षात येणार आहेत, याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. या चर्चा मला तुमच्याकडूनच ऐकायला मिळत आहेत, असे म्हणत लंके यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीच पूर्णविराम दिला. ते पुण्यातील मोदीबाग येथील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. (Nationalist Congress Party (Sharad Chandra Pawar) Party President Sharad Pawar put an end to the talks of Nilesh Lanka joining the party.)

आमदार निलेश लंके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली होती. त्यानंतर लंके यांना अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र आता स्वतः पवार यांनीच या केवळ चर्चाच असल्याचे म्हटले आहे.

ठाकरेंना दहा कोटी देऊन ओमराजेंना तिकीट मिळवून दिले; तानाजी सावंतांचा खळबळजनक गौप्यस्फोट

काय म्हणाले शरद पवार?

निलेश लंके परत आमच्यासोबत येणार, या चर्चांना काही अर्थ नाही. या चर्चा मला तुमच्याकडूनच ऐकायला मिळत आहेत. किती जण संपर्कात आहेत याबद्दल माहिती नाही. कारण आम्ही त्या उद्योगात नाही. अनेक लोक असे आहेत की, ज्यांना जे चालले आहे ते योग्य वाटत नाही. त्यांनी आमच्यापासून दूर जाण्याचे निर्णय घेतला आहे, सध्या तरी ते त्यांच्या निर्णयावरुन ते ठाम आहेत. पण अस्वस्थ आहेत. आमच्यासोबत कोण येणार आहे त्याची माहिती द्या, माझ्या समोर उभे करा, अशीही गुगली शरद पवार यांनी टाकली.

ईडीचा राजकीय वापर :

शरद पवार पुढे म्हणाले, ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. याचे उदाहरण कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या बाबतीत पहायला मिळते. महाराष्ट्रात देखील हेच सुरु आहे. आमदार अनिल देशमुख आणि खासदार संजय राऊत यांना विनाकारण अटक करण्यात आली. आमदार रोहित पवारांच्या बातमीत देखील त्यांच्या कारखान्याच्या जप्तीची प्रक्रिया सुरु करण्यात आली.  ईडीच्या पाच हजार केसेसपैकी फक्त पंचवीस केसेसचा निकाल लागला आहे. त्यातील किती प्रकरणात लोक दोषी आढळले आहेत, याचे प्रमाण शुन्य टक्क्यांहून कमी आहे.

भास्करराव, मी तुम्हाला काका म्हणत होतो; जाधवांच्या सभेनंतर निलेश राणे हळवे

ईडीने कारवाई केलेल्यांपैकी एकही व्यक्ती भाजपचा नाही. सगळेच विरोधी पक्षातील आहेत. 2004 ते 2014 या काँग्रेसच्या सत्तेच्या कालावधीत ईडी ने 26 कारवाया केल्या. त्यातील चाक नेते कॉंग्रेसचे होते तर तीनच नेते भाजपचे होते. याचा अर्थ काँग्रेसच्या सत्ताकाळात ईडीचा गैरवापर होत नव्हता. ईडीचा उपयोग दहशत निर्माण करण्यात होत आहे. रोहित पवारांना अटक होईल का? याबाबत भरवसा नाही. कारण अनिल देशमुख आणि संजय राऊत यांना देखील अटक करण्यात आली होती. असे म्हणत शरद पवार यांनी रोहित पवार यांच्या अटकेचीही भीती व्यक्त केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube