ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही, पाकिस्तानला नक्कीच धडकी भरणार…

Operation Sindoor Going On Indian Air Force Information : 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू झालं. त्यानंतर 86 तासांत युद्धबंदीची घोषणा, आणि आता पुन्हा ऑपरेशन सिंदूर सुरूच असल्याचं वृत्त समोर येतंय. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, अशी माहिती भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) दिली आहे.
पंतप्रधानांच्या निवासस्थानी एक हायलेवल बैठक झालीय. या मिटिंगमध्ये तिन्ही सेनाप्रमुख, सीडीएस, एनएसए आणि संरक्षण मंत्री उपस्थित होते. या बैठकीत नेमके कोणती खलबतं झाली, यासंदर्भात अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु या बैठकीनंतर भारताई हवाई दलाने एक ट्विटर पोस्ट केली आहे. या ट्विटमध्ये म्हटलंय की, भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमून दिलेली कामे अचूकतेने यशस्वीरित्या पार पाडली आहेत. ऑपरेशन राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत, जाणीवपूर्वक आणि सावधगिरीने पार पाडण्यात आले. ऑपरेशन्स अजूनही सुरूच आहे. योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल. सर्वांना खोटी माहिती प्रसारित करण्यापासून दूर राहण्याचे आवाहन, भारतीय हवाई दलाने केलं आहे.
VIDEO : पुण्यात चाललंय काय? थारचालकाने दुचाकीची लाईनच उडवली; सीसीटीव्हीत कैद
हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाहीये. खरं तर ऑपरेशन सिंदूरचा हेतू दहशतवाद्यांच्या (Terrorist) स्थानांवर हल्ला करणे, दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणे, असा आहे. हे ऑपरेशन दहशतवादाविरूद्ध आहे. हे कोणतंही देश किंवा लष्कराविरूद्ध ऑपरेशन नव्हतं.
India-Pakistan War : पाकिस्तानला पुन्हा संधी नाहीच! युद्धविरामानंतर माजी लष्करप्रमुख व्यथित…
22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ला (Pakistan) झाल्यानंतर 7 मे च्या मध्यरात्री म्हणजे 6 अन् 7 मेच्या दरम्यान रात्री उशीरा ऑपरेशन सिंदूर सुरू केलं गेलं होतं. तेव्हापासून दहशतवादाविरोधात हे ऑपरेशन सतत सुरूच आहे. आता भारतीय हवाई दलाने देखील याची पु्ष्टी केली आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय सैन्याच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरसोबत कोणतं अपडेट मिळतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.