Mahindra Thar ला देणार टक्कर देण्यासाठी Force Gurkha मैदानात, जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
2024 Force Gurkha : भारतीय बाजारात ऑफ रोड एसयूव्ही कार महिंद्रा थार (Mahindra Thar) आणि मारुती सुझुकी जिमनीला (Maruti Suzuki Jimny) टक्कर देण्यासाठी फोर्स मोटर्सने आज आपली 2024 Force Gurkha 3-door आणि 5-door कार लाँच केली आहे. कंपनीने 2024 Force Gurkha 3-door आणि 5-door व्हेरियंटमध्ये लाँच केली आहे.
जर तुम्ही 2024 Force Gurkha 3-door खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 16.75 लाख रुपये मोजावे लागणार आहे तर 2024 Force Gurkha 5-door खरेदीसाठी तुम्हाला 18 लाख रुपये एक्स शोरुम मोजावे लागणार आहे. 25,000 रुपयांच्या टोकन किंमतीवर तुम्ही 2024 Force Gurkha 3-door आणि 5-door कार बुक करू शकतात. माहितीनुसार, या दोन्ही ऑफ रोड एसयूव्ही कारची डिलिव्हरी मेच्या मध्यापर्यंत सुरू करण्यात येणार आहे. भारतीय बाजारात 2024 Force Gurkha 3-door आणि 5-door कार लोकप्रिय मारुती सुझुकी जिमनी आणि महिंद्रा थारशी स्पर्धा करणार आहे.
2024 Force Gurkha 3-door आणि 5-door फीचर्स
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने 2024 Force Gurkha 3-door आणि 5-door या दोन्ही कारमध्ये अपडेटेड फ्रंट आणि रीअर स्टाइलिंग याच बरोबर 18-इंच अलॉय व्हील तसेच लॉन्ग व्हीलबेससह या कारमध्ये 2 कॅप्टन सीट देखील कंपनीकडून देण्यात आले आहे.
या कारमध्ये कंपनीने 7-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ऑफ-रोडरमध्ये नवीन 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील दिले आहे. कंपनीने 4WD शिफ्टर देखील मॅन्युअल लीव्हरवरून शिफ्ट-ऑन-फ्लाय रोटर नॉबमध्ये समोरच्या सीटच्या दरम्यान बदलले आहे.
विवस्त्र करून मारहाण झाल्यानंतर कोपर्डीत तरुणाची आत्महत्या; पोलिसात गुन्हा दाखल
2024 Force Gurkha 3-door आणि 5-door इंजिन
कंपनीने या दोन्ही नवीन ऑफ रोड एसयूव्हीमध्ये अपडेटेड 2.6-लिटर टर्बोचार्ज्ड इंटर-कूल्ड डिझेल इंजिन दिले आहे. नवीन मोटर 138 bhp आणि 320 Nm पीक टॉर्क निर्माण करते. 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सद्वारे चारही व्हीकलना पॉवर पाठवली जाते. ऑफ-रोडरला फ्रंट आणि रियर लॉकिंग डिफरेंशियल देखील मिळतात.