विवस्त्र करून मारहाण झाल्यानंतर कोपर्डीत तरुणाची आत्महत्या; पोलिसांत गुन्हा दाखल

विवस्त्र करून मारहाण झाल्यानंतर कोपर्डीत तरुणाची आत्महत्या; पोलिसांत गुन्हा दाखल

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेन राज्य हादरलं होतं. आता त्याच कोपर्डीतून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाला काही जणांनी विवस्त्र करून मारहाण केली. त्याचे कपडे, मोबाइल आणि पैसेही काढून घेतले. या घटनेतून अपमानित झाल्याच्या भावनेतून तरुणाने थेट गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेला तरुण हा कोपर्डी अत्याचार प्रकरणातील एका आरोपीचा चुलत भाऊ असल्याचे समजते. दरम्यान, या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Ahmednagar : तळीरामांसाठी बॅड न्यूज! जिल्ह्यात चार दिवस ड्राय डे, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोपर्डी गावात 1 मे रोजी भैरवनाथाची यात्रा होती. गावाजवळील वस्तीवर राहणारा तरुणाला तमाशात नाचण्याच्या कारणावरुन काही जणांबरोबर वाद झाला. या वादानंतर त्या तरुणाला मारहाण करून विवस्त्र अवस्थेत स्मशानभूमीत सोडून दिले. त्यामुळे रात्रभर त्याला तिथेच राहावे लागले. यानंतर त्याच्या घरच्यांनी सकाळी त्याला घरी आणले. परंतु, नंतर दुसऱ्या दिवशी त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले.

आत्महत्या करण्याआधी या तरुणाने एक चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीत त्याने सगळा प्रकार सांगितला. तसेच आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांची नावे सुद्धा चिठ्ठीत लिहीली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. तपास सुरू केला आणि दोघा जणांना ताब्यात घेतले. आणखी एकाला अटक करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. या धक्कादायक प्रकाराने कोपर्डी पुन्हा हादरली आहे.

Ahmednagar News : शिरसगाव परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

follow us
  • fb
  • instagram
  • youtube