Ahmednagar : बारामती अॅग्रोवरील कारवाईचा निषेध; कर्जत कडकडीत बंद…

Ahmednagar : बारामती अॅग्रोवरील कारवाईचा निषेध; कर्जत कडकडीत बंद…

Ahmednagar : आमदार रोहित पवार (Rohit Pawar)सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या प्रश्नांवर केंद्र (Central Govt)आणि राज्य सरकारला (State Govt)आपल्या आंदोलनातून धारेवर धरत आहे. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार विद्यमान सरकार करत आहे. त्यांच्यावर आणि त्यांच्या बारामती अॅग्रो (Baramati Agro)कंपनीवर केवळ राजकीय स्वार्थ आणि सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक नामदेव राऊत (Namdev Raut)यांनी केला. यावेळी त्यांनी या घटनेचा निषेधही व्यक्त केला. ते कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कर्जत बंद (shutdown in Karjat city)आंदोलनाप्रसंगी बोलत होते.

“BJP आपल्या धर्माचा शत्रू , 20 ते 26 जानेवारी घरीच रहा” : बड्या मुस्लिम नेत्याचा सल्ला

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या कार्यालयावर ईडीने छापेमारी केली. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्यावतीने शनिवारी (दि.6) कर्जत बंदचे आवाहन केले होते. त्याला कर्जतकरानी सकारात्मक प्रतिसाद देत आपले सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवले.

“BJP आपल्या धर्माचा शत्रू , 20 ते 26 जानेवारी घरीच रहा” : बड्या मुस्लिम नेत्याचा सल्ला

कर्जतमध्ये आज सकाळी 11 वाजता छत्रपत्री शिवाजी महाराज चौकापासून कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार रोहित पवार आणि बारामती अॅग्रोवर झालेल्या ईडी कारवाईचा निषेध नोंदवण्यात आला.

राज्यात मागील काही महिन्यांपासून आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोवर कारवाई केली जाणार, कारखान्याची चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर आता ही कारवाई झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच ईडीच्या पथकानं कारवाईला सुरुवात केली.

बारामती अॅग्रो ग्रुपच्या मुंबई, पुणे आणि बारामतीसोबतच विविध सहा ठिकाणच्या ऑफिसवर धाडी टाकत कारवाई केल्याचे पाहायला मिळाले. काही दिवसांपासून भाजप नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यांनतर ही कारवाई झाली. त्याविरोधात आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून जोरदार निदर्शने केली जात आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube