शरद मोहोळ हत्याप्रकरण: मुख्य आरोपीसह आठ जणांना पोलिस कोठडी; पण वकिलांचा वेगळाच युक्तिवाद

  • Written By: Published:
शरद मोहोळ हत्याप्रकरण: मुख्य आरोपीसह आठ जणांना पोलिस कोठडी; पण वकिलांचा वेगळाच युक्तिवाद

Sharad Mohol Dead : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याच्या हत्येप्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना पोलिसांकडून (Pune Police) आज शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. मुख्य आरोपी मुन्ना ऊर्फ साहिल पोळेकर याच्यासह सहा जणांना पाच दिवसांची, तर पकडलेल्या दोन्ही वकिलांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

खोटे बोलून शिवसैनिकांचा विश्वासघात केलेल्यांना जागा दाखवणार, CM शिदेंची ठाकरेंवर घणाघाती टीका

साहिल उर्फ मुन्ना पोळेकर (वय 20, शिवशक्तीनगर, सुतारदरा, कोथरुड), नामदेव महपती कानगुडे (वय 35, रा. भुगाव, मुळशी), अमित उर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गाव्हणकर, विठ्ठल किसन गांदले या आरोपींना 10 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तर रवींद्र वसंतराव पवार (रा. नांदेगाव, मुळशी) व संजय रामभाऊ उडाण (रा. कोथरुड) या दोन वकिलांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

शरद मोहोळच्या हत्या प्रकरणात सर्व आठही आरोपींना काल रात्री पुणे पोलिसांनी अटक केली. दोन आरोपी वकील असून, त्यांच्याकडून आज कोर्टात जोरदार युक्तिवाद देखील करण्यात आला. सहा आरोपींचे वकीलपत्र आम्ही घेतले होते म्हणून आम्हाला अटक करण्यात आली असल्याचा युक्तिवादाच आरोपी वकिलांनी केला आहे.

‘हिंगोली’च्या बैठकीत राडा! खासदार पाटील अन् मंत्री सत्तार यांच्यात खडाजंगी; वादाचं कारण काय?


आरोपींना कुठून अटक ?

मोहोळ हत्याप्रकरणी आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तीन पिस्टल, दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात. शरद मोहोळ याच्या हत्येप्रकरणी कोथरूड पोलिस स्टेशनला खून करणे, भारतीय हत्यार कायदा कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर पुणे शहर गुन्हे शाखेच्या नऊ पथकांनी तपास सुरू केला होता. ही पथके पुणे शहराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण, सातारा व कोल्हापूरच्या दिशेने तपास करत होती. पुणे सातारा रोडवर किकवी – शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून 8 आरोपी, 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राउंड व 2 चार चाकी गाड्या ताब्यात घेण्यात आले होते.

नेमके काय घडले?

शरद मोहोळ याची काल भर दुपारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यापूर्वी आरोपींनी मोहोळच्या घरी एकत्र जेवण केले होते काल मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता.जेवण झाल्यानंतर हे सर्व बाहेर पडले होते. शरद मोहोळ पुढे तर आरोपी त्याच्या मागून चालत होते. त्यावेळी मागून चालणाऱ्या आरोपी साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर याने त्यांच्याकडील बंदुकीतून गोळ्या झाडण्यास सुरूवात केली. यात आरोपींनी चार राऊंड फायर केले त्यातील पहिली गोळी पायाला, दोन गोळ्या पाठीवर लागल्या. त्यावेळी कुणी हल्ला केला हे बघण्यासाठी शरद मोहोळ मागे वळला असता आरोपींनी चौथी गोळी झाडली जी मोहोळच्या थेट छातीवर लागली. या सर्व घटनेत शरद मोहोळ गंभीर झाला होता. त्यानंतर त्याला तत्काळ जवळ असणाऱ्या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज