‘हिंगोली’च्या बैठकीत राडा! खासदार पाटील अन् मंत्री सत्तार यांच्यात खडाजंगी; वादाचं कारण काय?

‘हिंगोली’च्या बैठकीत राडा! खासदार पाटील अन् मंत्री सत्तार यांच्यात खडाजंगी; वादाचं कारण काय?

Hemant Patil vs Abdul Sattar : हिंगोली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज हाय होल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. निधी वाटप करताना टक्केवारीचे शेण खाल्ले जात असल्याचा आरोप करत खासदार पाटील यांनी सत्तारांना खडसावले. या प्रकाराने सभेतील वातावरण काही काळ तणावाचे बनले होते. पुढे ही ऑनलाइन बैठक आवाज म्यूट करून घेण्याची नामुष्की ओढवली. या बैठकीच्या निमित्ताने शिंदे गटातील बेबनाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आता या प्रकारची पक्षश्रेष्ठी कशी दखल घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गौतमीच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी; अब्दुल सत्तार म्हणाले, लाठीचार्ज करा, इतकं मारा की.. 

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेत आज (शनिवार) जिल्हा नियोजन समतीची ऑनलाइन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या सुरुवातीलाच खासदार हेमंत पाटील यांनी निधी वाटपाच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त केला. निधी वाटपात भेदभाव होत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात इतके जिल्हे असतान हिंगोलीसारख्या मागास जिल्ह्यात येऊन अशा पद्धतीने शेण खाणे योग्य नाही, असे पाटील म्हणाले.

मग काय सत्तारांचाही पारा चढला. त्यानंतर दोघात जोरदार खडाजंगी उडाली. दोघांतील वादाने बैठकीतील वातावरण तणावपूर्ण बनले होते. अधिकारीही गोंधळात पडले. मध्यस्थी करून वाद मिटवण्याची हिंमत मात्र कुणीही करू शकले नाही. एकही आमदाराने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला नाही. जिल्ह्यातील विकासकामांच्या नियोजनात  निधी वाटपाच्या नियोजनावरून सातत्याने वाद होत आहेत. कधी आमदार तर कधी खासदार नाराज होत आहेत. आताही खासदार आणि थेट मंत्र्यांतच वाद सुरू झाले.

मराठा आरक्षण : खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा; दिल्लीत उपोषणही करणार!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube