मराठा आरक्षण : खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा; दिल्लीत उपोषणही करणार!

मराठा आरक्षण : खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा; दिल्लीत उपोषणही करणार!

मुंबई : हिंगोलीचे शिवसेना (Shivsena) खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी लोकसभा (Lok-Sabha) सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलकांच्या मागणीनंतर त्यांनी तात्काळ लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहुन राजीनामा सादर केला. याशिवाय दोन दिवसांंत दिल्लीत उपोषणाला बसणार असल्याची घोषणाही खासदार पाटील यांनी केली. दरम्यान, खासदार पाटील यांच्या राजीनाम्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Hingoli MP Hemant Patil has resigned from the Lok Sabha over the Maratha reservation issue)

खासदार पाटील यवतमाळच्या पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना येथे आले होते. यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला आणि घोषणाबाजी सुरु केली. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी मराठा आरक्षणाप्रश्नी आपण दिल्लीत खासदारांची बैठक बोलावली आहे, असे समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरी मराठा बांधवांची मागणी असेल तर एका मिनिटात राजीनामा देतो असे म्हणत त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहुन राजीनामा सादर केला.

मराठवाड्यात आंदोलन पेटलं; जालना तहसिलदारांची गाडी फोडली, चार जिल्ह्यात एसटी बंद

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मागील काही दिवसांपासून आंदोलन करत आहे. 17 दिवसांच्या उपोषणानंतर त्यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, या काळात आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्याचवेळी सकल मराठा समाज बांधवही चांगलेच आक्रमक झाले आहेत. जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर राज्यातील अनेक गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आली आहे.

या गावबंदीचा मागील काही दिवसांत केंद्रीय मंत्री भागवत कराड, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री हसन मुश्रीफ, भाजप खासदार प्रताप चिखलीकर पाटील चिखलीकर, आमदार एकनाथ खडसे, आमदार अशोक चव्हाण, माजी मंत्री रामदास कदम, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, माजी मंत्री बदामराव पंडीत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर अशा सर्वपक्षीय नेत्यांना फटका बसला आहे. त्यानंतर अहमदनगरमध्येही मंत्री दीपक केसरकर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन या तीन मंत्र्यांना विरोध करण्यात आला.

‘तुम्ही पाणी तरी प्या…’; संभाजीराजेंची जरांगे पाटलांना पुन्हा विनंती

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली :

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नी पुन्हा आमरण उपोषण सुरु केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. याकाळात त्यांनी अन्न-पाणी कशाचेही सेवन केलेले नाही. याशिवाय त्यांनी उपचार घेण्यासाठी डॉक्टरांना नकार दिला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडत चालली आहे, स्वतः जरांगे पाटील यांनीही मला जोपर्यंत बोलायला येते तोपर्यंत चर्चेला या असे आवाहन सरकारला केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube