Maratha Reservation : ‘तुम्ही पाणी तरी प्या…’; संभाजीराजेंची जरांगे पाटलांना पुन्हा विनंती

  • Written By: Published:
Maratha Reservation : ‘तुम्ही पाणी तरी प्या…’; संभाजीराजेंची जरांगे पाटलांना पुन्हा विनंती

Chhatrapati Sambhaji Raje Call to Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला चाळीस दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, सरकारने मराठा आरक्षणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळं जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं. त्यांनी जलत्यागही केल्यानं त्यांची तब्येत खालावत चालली आहे. दरम्यान, आता संभाजीराजेंनी (Chhatrapati Sambhaji Raje) जरांगे पाटलांना फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी करून पाणी पिऊन आंदोलन करण्याची मागणी केली.

Manoj Jarange : मनोज जरागेंचं सरकारला आवाहन म्हणाले, आता सरकारने…

जरांगे पाटलांच्या आंदोलनाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जरांगेनी पुन्हा एकदा आरक्षणसााठी आर-पारची लढाई सुरू केली. त्यांनी उपोषण सुरू केल्यानंतर संभाजीराजेंनी त्यांची उपोषणस्थळी भेट घेऊन जरांगे पाटलांना पाणी पिण्याची विनंती केली. जरांगे पाटलांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन पाणी ग्रहन केलं होतं. मात्र, त्यानंतर जरांगे पाटलांनी पाण्याचा घोटही घेतला नाही. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची तब्येत बिघडत चालली आहे. त्यामुळं संभाजीराजेंनी मनोज जरांगेंशी फोनवर चर्चा केली. यावेळी संभाजीराजेंनी तुम्ही तुब्यतेची काळजी घ्या. तुम्ही आमरण उपोषण करा. मात्र, पाणी पिऊनच उपोषण करा, अशी विनंती संभाजीराजेंनी केली.

नेमकी काय चर्चा झाली?
तुमची तब्येत चांगली राहणं हे मराठा समाजासाठी फार गरजेचं आहे. आरक्षणाचा प्रस्न सोडावायचा असेल तर तब्यतेची काळजी घ्या. तुम्ही ठीक असणं फार महत्वाचं आहे. आरक्षणाच्या लढ्याला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही पाणी पिऊन उपोषण करावं, अशी मागणी संभाजीराजेंनी केली.

यानंतर माध्यमांशी बोलतांना संभाजीराजे म्हणाले की, मनोज जरांगे हे अतिशय प्रामाणिकपणाने लढत आहेत. ज रांगे पाटलांनी मराठा समाजाची बाजू मांडण्यासाठी सरकारपुढे त्यांनी अनेक प्रस्ताव पुढे ठेवले आहेत. मात्र, सरकारकडून हा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळं त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं. उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे आणि त्यांची तब्येत खालवली आहे, म्हणून त्यांना विनंती आहे की त्यांनी पाणी पिऊन उपोषण करावं

मला चिंता वाटते की, मराठा समाजाची मुलं आत्महत्या करत आहे. सुसाईड नोट लिहून ते आयुष्य संपवत आहे. एकाने तर पाण्याची टाकीवरून उडी मारली. खरंतर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार नाही. महाजारांनी आपल्याला आपल्या हक्कांसाठी लढण्याची शिवकण दिली. आत्महत्या हा काही पर्याय नाही. आपण आपल्या मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून मागू शकतो. मात्र, आत्महत्या त्यावरचा उपाय नाही. त्यामुळं आत्महत्या करू नका, हे माझं समाज बांधवांना आव्हानं आहे असं सांगत उद्याच्या उपसमितीच्या मीटिंगमध्ये आरक्षण कसा देता येईल, यावर चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube