Sharad Mohol : गँगस्टर शरद मोहोळचा धसका संजय दत्तनेही घेतला होता….

  • Written By: Published:
Sharad Mohol : गँगस्टर शरद मोहोळचा धसका संजय दत्तनेही घेतला होता….

पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात काल (दि.5) भर दुपारी सुतारदरा भागात कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याचा त्याच्याच बॉडीगार्डने गोळ्या झाडून खून केला. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे. मोहोळ बरोबर जमिनीच्या आणि पैशाच्या जुन्या वादातून आरोपींनी मोहोळवर गोळीबार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. (Sharad Mohol Murder In Pune)

Video : गल्लीत कांदे विक्रेत्यांचा आवाज, विद्यार्थ्यांची लगबग अन् मोहोळचा ‘गेम’; CCTV फुटेज आलं समोर

मोहोळच्या मृत्यूनंतर त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे अनेक किस्से बाहेर येऊ लागले आहेत. एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, शरद मोहोळची इतकी दहशत होती की, अभिनेता संजय दत्तची येरवडा कारागृहात रवानगी होत होती, त्यावेळी येरवडा कारागृहात शरद मोहोळ आहे मला त्या ठिकाणी ठेवू नका, असं त्याने सांगितलं होतं. तेव्हा मोहोळची येरवडा कारागृहातून तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जवळपास 4 वर्ष तळोजा कारागृहात ठेवण्यात आल होतं. त्यानंतर जानेवारी 2021 मध्ये मोहोळ जामीन मिळाला होता.

Video : पत्नीचा फोटो लग्नाच्या शुभेच्छा अन्…; मोहोळनं हत्येपूर्वी ठेवलेले व्हॉट्सअप स्टेटस व्हायरल

2012 मध्ये मोहोळ येरवडा कारागृहात असताना जर्मन बेकरी ब्लास्टचा आरोपी महंमद कातील सिद्दीकीचा त्याने बर्मुडाच्या नाडीने गळा आवळून खून केला होता. त्यानंतर तो छोटा राजनसारखा हिंदुत्ववादी डॅान आहे असं सांगायचा, असं अनेकांकडून सांगितलं जायचं. त्यामुळे जेल मधल्या सर्वच आरोपींवर त्याचा धाक निर्माण झाला होता. याच दरम्यान, मुंबई ब्लास्ट प्रकरणात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्तला अटक करण्यात आली होती. यावेळी येरवडा कारागृहात रवानगी होत असताना संजय दत्त याने शरद मोहोळचे नाव घेऊन कारागृहात नेण्यात येऊ नये, असं बोलून दाखवलं होतं.

शरद मोहोळ कारागृहात असतानाच बिनविरोध उपसरपंच झाला होता….

शरद मोहोळ हा मोहोळ टोळीचा म्होरक्या होता. संदीप मोहोळचा सख्खा चुलत भाऊ होता. जेव्हा 2007 ला संदीप मोहोळचा खून गणेश मारणे याने केला होता. त्यावेळी शरद हा त्याची गाडी चालवत होता. या खूनानंतर शरद याने मारणे टोळीचा खात्मा करण्याची शपथ घेतली होती. 2010 साली शरद मोहोळने गणेश मारणे टोळीचा म्होरक्या किशोर मारणेचा पर्वती जवळील निलायम सिनेमा टॉकीजजवळ खून केला. 2021 मध्ये मोहोळ कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यावर त्याने मुंडण करून पतीत पवन संघटनेच्या सत्यनारायणाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. शिवाय अनेक कार्यक्रमांना हजेरीदेखील लावली होती. अलीकडच्या काळात त्याने गँगवॉरच्या कारवयांमध्ये सहभाग घेण टाळलं होत. तसेच राजकारणात सक्रिय झाल्यामुळे काही सामाजिक कार्यातदेखील त्याचा वावर वाढला होता. याचाच भाग म्हणून पत्नी स्वाती मोहोळ यांना भाजपकडून संघटनात्मक पदही मिळाला होतं.

लग्नाच्या वाढदिवशीच खून…

शरद मोहोळ याच्या लग्नाचा काल (दि.5) वाढदिवस होता. त्यामुळे सकाळपासूनच घरात आनंदाचे वातावरण होतं. सुतारदरा येथील घरात वाढदिवस साजरा केल्यानंतर शरद मोहोळ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी साथीदारांसह निघाला होता. तेव्हा मोहोळसोबत विठ्ठल गांडले, नितीन कानगुडे आणि साहिल पोळेकर हे बॉडीगार्ड म्हणून सोबत होते.

शरद मोहोळ खून प्रकरण : शेलार गॅंगची एक धमकी गॅंगवारसाठी ठरली ठिणगी..?

आपले बॉडीगार्डच आपला थोड्याच वेळात शेवट करतील याची पुसटशीही कल्पनाही मोहोळला नव्हती आणि इथेच घात झाला. घरातून बाहेर पडत असतानाच पाठीमागे असलेल्या बॉडीगार्डने आणि त्याच्या अन्य साथीदारांनी मोहोळवर त्यांच्याकडील बंदुकीतून गोळ्या झाडल्या अन् क्षणार्धात शरद मोहोळ रक्ताच्या थारोळ्यात पडला. गंभीर जखमी झालेल्या मोहोळला जवळच असलेल्या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube