शरद मोहोळचा गेम कसा झाला? पोलिसांनी सांगितली ए टू झेड माहिती

शरद मोहोळचा गेम कसा झाला? पोलिसांनी सांगितली ए टू झेड माहिती

Sharad Mohol Killed : कुख्यात गुंड शरद मोहोळची शुक्रवारी पुण्यातील कोथरूड परिसरात गोळ्या घालून हत्या (Sharad Mohol) करण्यात आली. मोहोळ याच्यावर त्याच्याबरोबर असलेल्या साथीदार मुन्ना उर्फ साहिल पोळेकर व इतर दोघांनी गोळीबार केला होता. या गुन्ह्यात आठ तासांत आठ आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले. पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोहोळवर कशा पध्दतीने हल्ला करण्यात आला. आरोपी कुठे पळून गेले होते. पोळेकर याने पिस्तूल कधी आणले होते. पोळेकर हा शरद मोहोळच्या संपर्कात कसा आला होता ? याची माहिती पोकळे यांनी दिली.

‘आमच्या राजकीय प्रयोगाचं कथानक चांगलं, विचार करा’; CM शिंदेंची पटेलांना थेट चित्रपटाचीच ऑफर

दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शरद मोहोळ हा स्वतःच्या घराकडे जात होता.त्याच्याबरोबर त्याचे साथीदार मुन्ना पोळेकर व इतर दोघे जण होते. तिघांनी तीन पिस्तूलमधून मोहोळवर गोळीबार केला. त्यानंतर तीनही आरोपीही घटनास्थळावरून पसार झाले. शरद मोहोळच्या हत्येनंतर पोलिसांनी पथके तयार केली. ही घटना पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पोळेकर याने मोहोळवर गोळीबार केल्याचे पोलिसांना सांगितले. तेथून पोलिसांना तपासाची दिशा मिळाली.

मोहोळ याला मारणारा पोळेकर याच्या मूळ गावी त्याचा शोध घेतला. खुनानंतर आरोपी हे घटनास्थळावरून टू व्हीलरवरून पळून गेले होते. ती दुसऱ्याची गाडी होती. ती बेवारस सापडली. ही गाडी सोडून पोळेकर व इतर दोघे हे हा स्वतःच्या कारमधून पळून गेल्या होतो. खेड-शिवापूर टोल नाक्यावरील सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोळेकर हा आपल्याचा गाडीतून गेल्याचे उघडकीस आले. सातारा रोडवरील शिरवळ भागात दोन कारमधून आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून शस्त्रही जप्त करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली.

तिघांनी मोहोळवर गोळ्या झाडल्या; मामाशी असलेल्या वैमनस्यातून काटा काढला !

शरद मोहोळवर मुन्ना पोळेकर व इतर दोघे अशा तिघांनी गोळ्या झाडल्याचे तपासात निष्पण झाले आहे. या घटनेमध्ये मुख्य आरोपी पोळेकर त्याचा मामा नामदेव महिपती कानगुडे, नातेवाईक विठ्ठल किसन गांधले याचे शरद मोहोळ याच्याबरोबर पूर्ववैमनस्य होते. त्यातूनच हा खून केला असल्याचे आरोपी सांगत आहेत. परंतु सखोल तपास सुरू असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले. तसेच या हत्या प्रकरणात पकडण्यात आलेल्या आठ आरोपींमध्ये दोन वकिलांचा समावेश आहे. त्यांचा या प्रकरणाशी संबंध काय याची चौकशी सुरू असल्याचे पोकळे यांनी सांगितले. रवींद्र पवार आणि संजय उड्डाण नामांकित वकील आहेत. ते दोघेही शिवाजी नगर सत्र न्यायालयात प्रँक्टीस करतात.

राजकारणाच्या मॅचमध्ये रायडूची ‘9 दिवसात’ विकेट : वायएसआर काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा

Shilpa Shetty: ब्युटी क्विन शिल्पा शेट्टीच्या घायाळ करणाऱ्या अदा…



मोहोळला संपविण्याचा कट कधी रचला? पिस्तुल कधी आणले ?

मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ राहत असलेल्या सुतारदरा परिसरातच राहतो.मोहोळच्या ऑफिसमध्ये त्याचे वर्ष सहा महिन्यांपासून नेहमी येण-जाणे होते. परंतु गेल्या वीस-पंचवीस दिवसांपासून तो सातत्याने मोहोळच्या संपर्कात जास्त आला होता. मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर याने हत्येसाठी तीन-चार महिन्यांपूर्वी पिस्तूल आणले असे तपासात उघडकीस आले आहे.

कानगुडेवर दोन, तर पोळेकरवर एक गुन्हा !
शरद मोहोळ व कानगुडे यांच्यामध्ये पूर्वी वाद झाला होता. त्याप्रकरणी गुन्हाही दाखल आहे. कानगुडेवर दोन गुन्हे आहेत. तर मुन्ना पोळेकरवर एक गुन्हा दाखल आहे. कानगुडे हा पूर्वी सुतारदरा भागात राहत होता. त्यानंतर भुगावला राहण्यासाठी गेला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube