राजकारणाच्या मॅचमध्ये रायडूची ‘9 दिवसात’ विकेट : वायएसआर काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा

राजकारणाच्या मॅचमध्ये रायडूची ‘9 दिवसात’ विकेट : वायएसआर काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा

अमरावती : क्रिकेटचे मैदान सोडून राजकीय मैदानात उडी घेतलेल्या अंबाती रायडूची (Ambati Rayudu) अवघ्या नऊ दिवसात विकेट गेली. रायडूने नऊ दिवसांमध्येच राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत: एक्स (ट्विटर) वरुन त्याने ही माहिती दिली. (Ambati Rayudu has decided to quit the YSRCP Party and stay out of politics for a little while)

अंबाती रायडू याने गत महिन्यात 28 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत युवजन श्रमिक रायथू काँग्रेस पक्ष अर्थात वायएसआर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेद्दीरेड्डी मिथून रेड्डीही यावेळी उपस्थित होते. येत्या दोन महिन्यात होणाऱ्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्याला तिकीट मिळणार असल्याच्याही चर्चा होत्या.

AUS vs PAK : कांगारूंचा पाकिस्तानला व्हाईटवॉश; अखेरचा सामना जिंकत मालिकाही खिशात

मात्र आता रायडूने राजकारणापासून काही काळ लांब राहणार असल्याचे सांगत वायएसआर काँग्रेसला रामराम केला आहे. त्याने यासंदर्भात बोलताना सांगितले, ‘आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की, मी वायएसआर काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच मी काही काळ राजकारणापासूनही दूर राहणार आहे. पुढे जो निर्णय घेईल त्याबाबत आपल्याला नक्की माहिती देईन’, असेही त्याने सांगितले.

T20 World Cup 2024 : वेळापत्रक जाहीर; 9 जूनला भारत-पाकिस्तान ‘या’ ठिकाणी भिडणार !

अंबाती रायडूचे क्रिकेट करिअर :

अंबाती रायडू हा मागील एक दशकापासून टीम इंडियाचा भाग होता. मात्र अनेकदा त्याला दुखापत किंवा फॉर्मशी झगडावे लागल्याने टीम इंडियाच्या आतबाहेर करावे लागले. रायडूने 55 वन डे आणि केवळ 6 टी-20 सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर 2019 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र तो आयपीएलमध्ये खेळत होता. गतवर्षी त्याने आयपीएलमधूनही संन्यास घेतला. आयपीएलमध्ये त्याने 203 सामने खेळले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या