“BJP आपल्या धर्माचा शत्रू , 20 ते 26 जानेवारी घरीच रहा” : बड्या मुस्लिम नेत्याचा सल्ला

“BJP आपल्या धर्माचा शत्रू , 20 ते 26 जानेवारी घरीच रहा” : बड्या मुस्लिम नेत्याचा सल्ला

नवी दिल्ली : “भारतीय जनता पक्ष आपल्या धर्माचा शत्रू आहे. त्यामुळे मुस्लिमांनी 20 ते 26 जानेवारी दरम्यान घरीच राहावे. राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेवेळी ट्रेनने प्रवास करणे टाळावे, असा वादग्रस्त सल्ला ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे (All India United Democratic Front) अध्यक्ष बदरुद्दीन अजमल यांनी भारतातील (India) मुस्लिम समाजाला दिला आहे. ते एका जाहीर सभेत बोलत होते. अजमल यांच्या या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी पलटवार केला आहे. (Badruddin Ajmal has given a controversial advice to the Muslim community in India to stay at home from January 20 to 26.)

‘भाजप मुस्लिमांचा द्वेष करत नाही’

गिरीराज सिंह म्हणाले, “भाजप मुस्लिमांचा द्वेष करत नाही. आम्ही ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्राने काम करतो.” अयोध्या जमीन विवाद प्रकरणातील माजी वकील इक्बाल अन्सारी यांना राम मंदिराच्या अभिषेक समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले आहे आणि ते प्रार्थनेलाही उपस्थित राहणार आहेत, सहभागी होणार आहेत. बद्रुद्दीन अजमल आणि असदुद्दीन ओवेसी सारखे लोक समाजात द्वेष पसरवतात, असाही आरोप सिंह यांनी केला.

अयोध्येमध्ये 22 तारखेळा उत्सव :

येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी भाजप आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. देशातील विविध ठिकाणी राम मंदिर सोहळ्याचा ऐतिहासिक क्षण दिवाळी सणासारखाच साजरा करण्यात यावा, असे आवाहन भाजप नेत्यांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे देशभरात येत्या 22 जानेवाारीला दिवे लावून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहेत.

गर्भगृहात केवळ पाच जणांना प्रवेश :

दरम्यान, प्राणप्रतिष्ठेवेळी मंदिराच्या मुख्य गर्भगृहात केवळ पाचच व्यक्ती उपस्थित असणार आहेत. ज्यात प्रमुख यजमान म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) असणार आहे. मोदींशिवाय गर्भगृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास हे उपस्थित असतील.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज