22 जानेवारी रोजी अयोध्येत विराजमान होणार रामलल्ला; मोदींना पूजेसाठी खास निमंत्रण

22 जानेवारी रोजी अयोध्येत विराजमान होणार रामलल्ला; मोदींना पूजेसाठी खास निमंत्रण

Ayodhya Ram Mandir :  अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेसाठी राम मंदिर ट्रस्टने पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवले असून अद्याप त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. 22 जानेवारी 2024 रोजी रामललाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरु करण्यात आलेली आहे. राम मंदिर ट्रस्टने याची माहिती दिली आहे. एबीपी हिंदी वृत्त वाहिनीने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे.

PM Modi US Visit : अमेरिकन व्यावसायिकांमध्येही पंतप्रधान मोदींची क्रेज; दौऱ्याआधीच सुरु केली ‘मोदी थाळी’

22 जानेवारी 2024 ही तारीख आहे ज्या दिवशी राम मंदिराच्या दर्शनासाठी कोट्यवधी भाविकांची प्रतीक्षा संपणार आहे. हा तो दिवस असेल जेव्हा प्रभू रामलला गर्भगृहात बसतील. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी देशातील सर्व प्रदेशातील मंदिरे सजवली जाणारा आहे. तर काही ठिकाणी श्री रामजन्मभूमी मंदिरात होणारा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमही देशातील विविध ठिकाणी ऑनलाई पद्धतीने दाखवला जाणार आहे. गर्दीच्या व्यवस्थापनाबाबतही संपूर्ण तपशीलवार आराखडा तयार करण्यात आला आहे. एवढेच नाही तर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमादरम्यान वास्तुपूजनापासून विविध विधी आणि पूजाही करण्यात येणार आहेत.

Video : पोलिसांनी घरात कोंडून मारलं; आळंदीतील घटनेची वारकऱ्याने सांगितला आपबिती

आतापर्यंतच्या बांधकामाबद्दल बोलायचे झाले तर राम मंदिरातील रामललाच्या गर्भगृहाच्या वरच्या भागात बांधकाम सुरू आहे. ऑक्टोबर 2023 पर्यंत, राम मंदिराचा पहिला मजला तयार होईल आणि 24 जानेवारी 2024 रोजी रामललाला अभिषेक केला जाईल. हा कार्यक्रम सुमारे सात दिवस चालणार आहे. त्यानंतर रामभक्त रामललाच्या दर्शनासाठी मंदिरात येऊ शकतील. आता यासंदर्भात राम मंदिर ट्रस्टकडून पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. ज्यावर पंतप्रधान कार्यालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube