मोठी बातमी : अभेद्य होणार ‘श्रीरामांची’ सुरक्षा; अयोध्येत होणार NSG हब, मोदींचा धडाकेबाज निर्णय

  • Written By: Published:
मोठी बातमी : अभेद्य होणार ‘श्रीरामांची’ सुरक्षा; अयोध्येत होणार NSG हब, मोदींचा धडाकेबाज निर्णय

नवी दिल्ली : रामजन्मभूमी अयोध्येच्या सुरक्षेसाठी मोदी सरकारडून मोठी योजना आखण्यात आली आहे. या योजनेनुसार अयोध्येत (Ayodhya) NSG हब बनवले जाणार आहे. दहशतवादी हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीवर मंदिर उभारल्यापासून दहशतवादी धोक्याची भीती वाढली आहे. अशा धोक्यांना तोंड देण्यासाठी केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. (NSG Hub Will Be Established In Ayodhya) 

चार राज्यांचं भाजपाच्या मेहनतीवर पाणी.. दक्षिण अन् पूर्वेतला विजयही झाकोळला

22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लांच्या अभिषेकानंतर मंदीर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे. मंदिर उभारल्यापासून येथील सुरक्षेवर सातत्याने प्रश्न उपस्थित  केले जात होते. याशिवाय येथे येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी असून, येथे दररोज दीड लाखांहून अधिक भाविक येत असतात. अशा परिस्थितीत येथील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. याच पार्शभूमिवर अयोध्येत एनएसजीचे हब तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडून योजना तयार करण्यात आली असून, एनएसजी हबमध्ये ब्लॅक कॅट कमांडो तैनात केले जातील असे सांगितले जात आहे. सुरक्षेसाठई अयोध्येत NSG चे इंटीग्रेटेड हब बनवण्यावर भर दिला जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.

भव्य राम मंदिरानंतरही भाजपने अयोध्या का गमावली? वाचा ग्राऊंड रिअॅलिटी

कशी असणार अभेद्य सुरक्षा?

एनएसजीकडे दहशतवादविरोधी आणि अपहरणविरोधी कारवायांचे नेतृत्व सोपवण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारचा दहशतवादी धोका असल्यास दिल्लीतून एनएसजी कमांडो पाठवण्याऐवजी त्याला सामोरे जाण्याची जबाबदारी तेथे तैनात असलेल्या ब्लॅक कैट कमांडोकडे असेल.

Modi 3.0 : मोदी सरकारची पहिलीच अग्नीपरीक्षा; 24 जूनपासून संसदेचे विशेष अधिवेशन

आता कशी आहे सुरक्षा? 

आतापर्यंत राम मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पीएसी जवान दर दोन महिन्यांनी बदलले जात असल्याची माहिती आहे. राम मंदिराच्या सुरक्षेसाठी पीएसीच्या 8 कंपन्या यूपी एसएसएफला देण्यात आल्या आहेत. याशिवाय एटीएसची तुकडीही अयोध्येत सुरक्षेसाठी तैनात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube