आम्ही निवडणुकीपुरतेच हिंदू नाही तर रामसेवक; रामल्लांच्या दर्शनानंतर फडणवीसांची टीका

आम्ही निवडणुकीपुरतेच हिंदू नाही तर रामसेवक; रामल्लांच्या दर्शनानंतर फडणवीसांची टीका

Devendra Fadnvis : आम्ही निवडणुकीपुरते हिंदु नाही तर रामसेवक असल्याची बोचरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी विरोधकांवर केलीयं. दरम्यान, लोकसभा निवडणुकांचा प्रचार संपताच देवेंद्र फडणवीस अयोध्येत (Ayodhya Ram Mandir) रामलल्लांचरणी लीन झाले आहेत. रामलल्लांच्या दर्शनासह त्यांनी काशी विश्वनाथाचंही दर्शन घेतलं आहे. अयोध्येत माध्यमांशी बोलत होते.

पोर्श कार अपघात : विधानं मागे घ्या, अन्यथा 72 तासांत नोटीस धाडणार; शंभूराज देसाईंचा इशारा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राम मंदिर नव्याने उभारल्यानंतर दर्शनाची प्रचंड ओढ होती. 3 वेळा कारसेवक आणि अनेकदा रामसेवक म्हणून अयोध्येत आलो. पण, आज रामाचे दर्शन घेतल्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. देवाला काहीच मागायचे नसते, त्याला सारे काही ठावूक असते. आपल्या हयातीत राम मंदिर होईल, हे ठावूक नव्हते. पण, मोदीजींचे आभार की हे मंदिरही झाले आणि त्याचे दर्शन घेण्याची संधीही मला मिळाली. आम्ही निवडणुकीपुरते हिंदू नाही तर आम्ही रामसेवक आहोत आणि रामाला मानतो असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

लोकसभेचा ‘लातूर पॅटर्न’; देशमुखांच्या बालेकिल्ल्यात कुणाची हवा?, भाजप हॅट्रीक मारणार का?

फडणवीसांनी न्यासाच्या पुस्तिकेत काय लिहिलं?
“ज्या रामाच्या मंदिर पुननिर्माणात कारसेवक म्हणून सेवा देण्याची संधी मला मिळाली, त्याच मंदिराचे पुननिर्माण झाल्यानंतर प्रत्यक्ष रामललांचे दर्शन घेण्याची संधी सुद्धा मला मिळाली, हे माझे परमभाग्य आहे. मी रामललांचे खूप खूप आभार मानतो. राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या या यज्ञात आहुती देणार्‍या सर्वांना मी नमन करतो. विशेषत्वाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, या न्यासाचे सर्व विश्वस्त आणि मंदिर निर्माणातील विश्वकर्मांच्या दुतांना मी प्रणाम करतो, जय श्रीराम.”

अयोध्येत मराठी बांधवांचा ‘400 पारचा नारा’
अयोध्येतील राममंदिरात दर्शन घेतल्यानंतर बाहेर त्यांनी बांधकाम कामगारांसोबत छायाचित्र सुद्धा काढून घेतले आणि महाराष्ट्रातून दर्शनासाठी आलेल्या बंधू, भगिनींच्या भेटीसुद्धा घेतल्या. देवेंद्र फडणवीस यांना पाहताच मराठी बांधवांनी ‘400 पार-मोदी सरकार’ असे नारे दिले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube