अयोध्या ते काळाराम मंदिर! ठाकरेंच्या नव्या खेळीने भाजपाच्या ‘पॉलिटिक्स’वर कडी

अयोध्या ते काळाराम मंदिर! ठाकरेंच्या नव्या खेळीने भाजपाच्या ‘पॉलिटिक्स’वर कडी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : Ram Mandir Politics : अयोध्येत राम मंदिर सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. देश-विदेशातील रामभक्तांसाठी हा आंनदाचा क्षण असला तरी या मुद्यावरून राजकरण चांगलंच तापलं आहे. विशेषत: नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकमेकांसमोर आले आहेत. शह काटशह दिला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी राममंदिराला (Ayodhya Ram Mandir) पर्याय म्हणून काळाराम मंदिराची निवड केली. पण पंतप्रधान मोदी यांनी काळाराम मंदिराला (kalaram Mandir) ठाकरेंच्या आधीच भेट देत श्रेयाची लढाई जिंकल्याचं दाखवून दिलं. आता उद्धव ठाकरे यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना काळाराम मंदिराचे निमंत्रण दिले. त्याचबरोबर काळाराम मंदिरात कारसेवकांच्या हस्ते महाआरती केली जाणार आहे. ज्याचे काम त्याला श्रेय हाच संदेश देण्याची योजना ठाकरे गटाने आखली आहे.

अयोध्येतील राममंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना (Ram Mandir Pran Pratishtha) होईल. त्याचदिवशी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्यावतीने नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये महाआरती केली जाणार आहे. ही महाआरती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी राष्ट्रपतींना शिवसेनेने आमंत्रण देण्याचं जाहीर केलं. याचबरोबर नाशिकच्या गोदातीरी महाआरती केली जाणार आहे. महाआरती बाबरी पाडणाऱ्या कारसेवकांच्या हस्ते केली जाणार आहे. उद्धव ठाकरे स्वतः महाआरतीला उपस्थित राहतील.

काळाराम मंदिरातील आरतीसाठी राष्ट्रपतींना आमंत्रण; भाजपवर निशाणा साधत ठाकरेंची ‘तिरकी’ चाल

अयोध्येत राम मंदिर सोहळा साजरा केला जात आहे. हा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भोवती कसा राहील याची खबरदारी पंतप्रधान कार्यालय तसेच भाजपाने घेतली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) राम मंदिर हा अतिशय मोठा मुद्दा असणार हे नक्कीच आहे. हे पाहता यात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. राम मंदिर सोहळ्याचे आमंत्रण शिवसेनेला देण्यात आले नाही. त्यानंतर शिवसेनेकडून हा संघर्ष अधिक तीव्र झाला.

अयोध्येत राम मंदिर सोहळा होईल त्याचवेळी आपण काळाराम मंदिरात महाआरती करणार असल्याचे ठाकरेंनी जाहीर केले. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा निश्चित झाला होता. मोदी यांचा दौरा केवळ राष्ट्रीय युवा क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन असा करण्यात आला होता. याच दौऱ्यात ऐनवेळी बदल करून काळाराम मंदिर भेटीच्या कार्यक्रमाचे नियोजन केले गेले. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या काळाराम मंदिर कार्यक्रमांचे महत्त्वच कमी करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी केल्याचे बोलले जाते आहे.

Ram Mandir उद्घाटनाकडे चारही शंकराचार्यांनी फिरवली पाठ; ‘या’ कारणामुळे अयोध्येला जाणार नाही

मोदी यांच्या काळाराम मदिर भेटीनंतर एक दिवसासानंतर उद्धव ठाकरे यांनी आता राष्ट्रपतींना निमंत्रण देत यात भाजपला काटशह देण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते महाआरतीची घोषणा ठाकरे यांनी केली. शिवसेना एवढ्यावरच थांबली नाही. या गोदातीरी होणारी आरती ही बाबरी पडणाऱ्या कारसेवकांच्या हस्ते केली जाणार आहे. राष्ट्रपती या कार्यक्रमाला येतील का हा प्रश्न अजून तरी अनुत्तरीत आहे. पण, ‘ज्याचे काम त्याला श्रेय‘ हा संदेश या नियोजनावरून दिला आहे. २२ जानेवारी पर्यंत हे शह काटशहच्या या राजकारणात अजून नवे अंक जोडले जाणार का हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज