काळाराम मंदिरातील आरतीसाठी राष्ट्रपतींना आमंत्रण; भाजपवर निशाणा साधत ठाकरेंची ‘तिरकी’ चाल

काळाराम मंदिरातील आरतीसाठी राष्ट्रपतींना आमंत्रण; भाजपवर निशाणा साधत ठाकरेंची ‘तिरकी’ चाल

Uddhav Thackeray : गुजरातेतील सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रितिष्ठेवेळी देशाचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांना आमंत्रित करण्यात आले होते आणि त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. तसेच आता अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठेसाठी राष्ट्रपतींना आमंत्रित करावे अशी आमची मागणी आहे. आता ते त्यांना आमंत्रित नाही करतील हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु, आम्ही मात्र 22 तारखेला नाशिकच्या काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) जाणार आहोत. गोदावरी नदी येथे आरतीही करणार आहोत. त्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  (Draupadi Murmu) यांना आमंत्रित करत आहोत, अशी माहिती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली. यावेळी त्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपवर जोरदार टीका केली.

Ram Mandir उद्घाटनाकडे चारही शंकराचार्यांनी फिरवली पाठ; ‘या’ कारणामुळे अयोध्येला जाणार नाही

येत्या 22 जानेवारीला आम्ही नाशिकला काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत. त्यानंतर 23 जानेवारीला शिबीर आणि संध्याकाळी जाहीर सभा होणार आहे. याआधीच हा कार्यक्रम जाहीर केला आहे. गुजरातमधील सोमनाथ मंदिराचा सुद्धा अनेकदा विध्वंस झाला होता मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मंदिर पुन्हा बांधले. सोमनाथ मंदिरसाठी प्राणप्रतिष्ठा होती तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना बोलावले होते. तसेच आता अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir PranPratishta) सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करावे, अशी आमची मागणी असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. राजकारण्यांनी आता बाजूला बसले पाहिजे जर राष्ट्रासाठी असेल तर राष्ट्रपतींनी प्राणप्रतिष्ठापणा केली पाहिजे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

राम मंदिरात रामाची मूर्ती असेल का ?

मी हिंदू आहे याला माझा विरोध असण्याचे काही कारण नाही. प्राणप्रतिष्ठेसाठी ते जर लालकृष्ण अडवाणींनाही ते बोलवत नसतील तर आणखी काय बोलायचे. आता मला वाटत आहे की राम मंदिरात रामाची मूर्ती असेल की नाही. राम मंदिरात स्वतःची नाही तर प्रभू रामचंद्रांची मूर्ती ठेवा. अटल सेतूवर अटलजी यांचा फोटोही नव्हता अशी टीका ठाकरे यांनी केली.

बिस्कीट, कॉफी, ढोकळा कशावरही चर्चा करा 

राम मंदिराचे उद्घाटन होणार याचा सगळ्यांनाच आनंद आहे. या कार्यक्रमप्रसंगी देशात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. दिवाळी जरूर साजरी करा. पण त्यानंतर देशाचे जे दिवाळे निघणार आहे त्यावरही चर्चा कर. चाय पे चर्चा किंवा कॉफी पे चर्चा करा. बिस्कीट ढोकळा कशावरही चर्चा करा पण या मुद्द्यांवर चर्चा करा, असे आवाहन ठाकरेंनी केले.

PM Modi यांचं नाशिकमध्ये आगमन; शिंदे, फडणवीस अन् अजितदादांकडून स्वागत, पाहा फोटो

श्रीराम मंदिर व्हावे ही माझीही इच्छा 

मी कडवट हिंदुत्ववादी आहे. श्रीराम मंदिर व्हावे अशी लाखो भक्तांसह माझीही इच्छा आहे. श्रीराम मंदिरासाठी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली भूमिका जनतेला माहिती आहे. कारसेवकांचे योगदानह मोठे आहे. कारसेवकांनी धाडस केले नसते तर आज मंदिर उभे राहिले नसते. झेंडे लावायला अनेक जण येतात पण लढण्याची वेळ येते तेव्हा आपण कुठे होतो याचे उत्तर आज या लोकांकडे नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज