PM Modi यांचं नाशिकमध्ये आगमन; शिंदे, फडणवीस अन् अजितदादांकडून स्वागत, पाहा फोटो

PM Modi : पंतप्रधान मोदी यांचा आज (12 जानेवारी) महाराष्ट्र दौरा आहे. त्यामध्ये नाशिकपासून या दौऱ्याला सुरूवात झाली.

पंतप्रधान मोदी यांचं नाशिकमध्ये आगमन झाले. तेव्हा शिंदे, फडणवीस अन् अजितदादांकडून त्यांचे निलगिरी बाग हेलिपॅडवर पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी हे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सव आणि मुंबईतील अटल सेतूच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले आहेत.
