Ram Mandir : प्रभु श्रीरामांची अयोध्या कुणी वसवली? इतिहास काय सांगतो?

Ram Mandir : प्रभु श्रीरामांची अयोध्या कुणी वसवली? इतिहास काय सांगतो?

Ram Mandir : अयोध्येमध्ये निर्माण करण्यात आलेल्या भव्य अशा राम मंदिराची (Ram Mandir) चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? प्रभु श्रीरामांची अयोध्या कुणी वसवलेली आहे? तिचा इतिहास काय? तुम्हालाही हे प्रश्न पडले आहेत ना चला तर जाणून घेऊ अयोध्येचा इतिहास…

शाहरुखच्या ‘डंकी’ची बॉक्स ऑफिसवरील हवा ओसरली, 19 व्या दिवशी सर्वात कमी कमाईची नोंद

अयोध्या नगरीचा उल्लेख रामायणामध्ये मिळतो. त्यानुसार अयोध्येची स्थापना मनुने केली होती. तसेच आयोध्या हिंदू धर्मातील सात पवित्र स्थळांपैकी एक आहे. ज्यामध्ये अयोध्या, मथुरा, हरिद्वार, काशी, कांची, अवंतिका आणि द्वारका यांचा समावेश आहे. सांगितलं जातं की, अयोध्या प्राचीन कोसल या राज्याचा भाग होता. कोसलची राजधानीच अयोध्या होती. तसेच वेगवेगळे इतिहासकारांच्या मते कोसल राज्याची राजधानी ही साकेत होती. तर अयोध्या ही तिच्या जवळची एक छोटी नगरी होती. मात्र अनेकांच्या मते साकेतचंच नाव पुढे अयोध्या पडलं. असेही सांगण्यात येत. प्राचीन ग्रंथांच्या अनुसार अयोध्येची स्थापना इसवी सन पूर्व 2200 च्या आसपास झाली.

मोठी बातमी : निकालाच्या एक दिवस आधी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ED ची धाड

अयोध्येच्या निर्माणाचा संबंध ब्रह्मदेवाचे पुत्र मनुशी लावला जातो. असं सांगितलं जातं की, सत्ययुगात आयोध्येला वैवस्वत मनुने निर्माण केलं. ज्याचे इल, इक्ष्वाकु, कुशनाम, अरिष्ट, धृष्ट, नरिष्यन्त, करुष, महाबली, शर्याति आणि पृषध वैवस्वत हे दहा मुलं होते. ज्यापैकी इक्ष्वाकुच्या कुलामध्ये पुढे प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला.

Radhakrishna Vikhe : ..तर बदनामीचा गुन्हा दाखल करावाच लागेल; ‘त्या’ आरोपांवर विखे पाटील संतापले

तसेच असे देखील सांगण्यात येते की, श्रीरामांचा पुत्र लव्ह याने श्रावस्ती ही नगरी वसवली होती. जिचा उल्लेख देखील पुढे आठशे वर्षांपर्यंत मिळतो. तर श्रीरामाचा दुसरा पुत्र कुश यांनी राजधानी अयोध्येच पुनर्निर्मान केलं होतं. जे सूर्यवंशातील 44 पिढ्यांपर्यंत टिकलं. त्रेता युगातील प्रभू रामचंद्रांपासून व्दापार युगातील महाभारत आणि त्यानंतरही कित्येक शतकं अयोध्येतील सूर्यवंश आणि इक्ष्वाकु वंशाचा उल्लेख मिळतो. तर महाभारताच्या युद्धामध्ये अयोध्या नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला होता. याच वंशाच्या बृहद्रथला महाभारताच्या युद्धात अभिमन्यूने मारलं होतं.

PM Modi वरील टीकेचा मालदीव टुरिझम इंडस्ट्रीकडून निषेध; प्रत्येक संकटात भारतच येतो धावून

पुढे सातव्या शतकामध्ये चिनी प्रवासी ह्युएन-त्सांग याने अयोध्येला पिकोसिया या नावाने संबोधलं. त्यांने सांगितल्यानुसार हे शहर चिनी मोजमापाच्या परिमाणानुसार 16 ली 16 ली म्हणजे 1/6 (एक शष्टांश) मैल एवढं होतं. तर मुगल सम्राट अकबराच्या आईन-ए-अकबरी या पुस्तकामध्ये अयोध्या शहराची लांबी 148 कोस आणि रुंदी 32 कोस होती.

Ankita Lokhande: अमल मल्लिकच्या पाठिंब्याने अभिनेत्रीच्या बिग बॉसच्या प्रवासाला कलाटणी

तसेच काही पुराणांनुसार असे देखील सांगितले जाते की, उज्जैनचा राजा विक्रमादित्य हा जेव्हा अयोध्येमध्ये शिकारीसाठी आला होता. त्यावेळी त्याला या नगरीमध्ये काही चमत्कार दिसले होते. तर शोध घेतल्यानंतर राजाला ही प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी असल्याचे समजलं आणि त्यानंतर याच राजा विक्रमादित्याने या ठिकाणी प्रभू श्रीरामांचे मंदिर निर्माण केलं होतं.

त्यानंतर चौदाव्या शतकात जेव्हा भारतावर मुघल सम्राटांनी आक्रमण केलं. त्यावेळी अयोध्येतील राम मंदिर नष्ट करण्यात आले. त्या ठिकाणी 1525 मध्ये मुगल सम्राट बाबर याचा सेनापती मीर बाकी याने बाबरी ही मस्जिद बांधली. हाच अयोध्येच्या श्रीरामांच्या जन्मभूमीवरील राम मंदिर आणि बाबरी मज्जिद वाद कित्येक शतक चालला. ज्यावर 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला. आणि या निकालानंतर पाचच वर्षात आयोध्येत आता प्रभू श्रीरामांच्या भव्य अशा मंदिराचं उद्घाटन होणार आहे. तर मंडळी तुम्हाला माहिती असलेला अयोध्येचा इतिहास आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज