ब्रिटीशांना मदत करणाऱ्यांना जमीन देणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या; शिरसाट रोहित पवारांच्या रडारवर

Rohit Pawar Criticize Minister Sanjay Shirsat on gives land to Bivalkar Family who helps British : गेल्या काही दिवासांपासून सरकारमधील मंत्र्यांवर राजीनाम्याचे सावट निर्माण झालेले आहे. त्यात आता शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे. यामागील कारण काय जाणून घ्या…
काय म्हणाले रोहित पवार?
मराठा साम्राज्याविरोधात ब्रिटीशांना मदत केल्याप्रकरणी नवी मुंबई परिसरातील सुमारे 4 हजार एकरहून अधिक जमीन ब्रिटीशांनी बिवलकर नावाच्या कुटुंबाला दिली होती. नंतरच्या विविध कायदे, नियम आणि निकालानुसार ही जमीन सरकारजमा झाली, परंतु वेगवेगळ्या प्रकारे गोलमाल करुन ही जमीन परत मिळवण्याचा बिवलकर कुटुंबाने सातत्याने प्रयत्न केला.
त्यालाही त्या त्या टप्प्यावर नकार मिळाला, पण विद्यमान मंत्री संजय शिरसाठ साहेब यांनी 2024 मध्ये सिडकोचे अध्यक्ष होताच सगळे नियम बाजूला सारून पहिल्याच बैठकीत यातील सुमारे 15 एकर जमीन या बिवलकर कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला. या जमिनीचा बाजारभाव सुमारे 5 हजार कोटी रुपये असून या जमिनीवर सिडकोला गरीबांसाठी सुमारे 10 हजार घरं बांधता आली असती, पण गरीबांच्या हक्काची जमीन शिरसाठ साहेब यांनी बिवलकर कुटुंबाच्या घशात घातली.
मतचोरी प्रकरण, विरोधक आक्रमक; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध महाभियोगाची तयारी
एकीकडं 5 हजारहून अधिक स्थानिक भूमिपुत्र जमिनीसाठी वर्षानुवर्षे संघर्ष करत आहेत. त्यांना जमीन दिली जात नाही, पण मराठा साम्राज्याविरोधात काम करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला बेकायदेशीरपणे पहिल्याच बैठकीत जमीन दिली जाते, ही एकप्रकारे भूमिपुत्रांच्या बाबतीतही गद्दारीच आहे. त्यामुळं बेकायदा पद्धतीने बिवलकर कुटुंबाला दिलेल्या या जमिनीसह राज्यातील अशा प्रकारच्या सर्वच जमिनी सरकारने परत घ्याव्यात आणि मंत्री संजय शिरसाठ यांचा राजीनामा घ्यावा, ही विनंती. अशी मागणी करत रोहित पवारांनी केली आहे. त्यामुळे आता पवारांच्या रडारवर आता मंत्री शिरसाट आले आहेत.