वाढीव लाईट बिलावरून टीका पण वीज मंडळाने हिस्ट्री काढताच कंगनाच ठरली डिफॉल्टर

Kangana Ranaut defaulter after electricity board made history : अभिनेत्री कंगना राणौत ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे किंवा तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत येते. यावेळी देखील कंगनाने तिच्या वापरत नसलेल्या घरातील लाईट बिलावरून वीज मंडळाला धारेवर धरलं होतं. मात्र त्यावर हिमाचल वीज मंडळाने तिच्या आतापर्यंतच्या लाईट बिलाची हिस्ट्री दाखवत कंगनाला चांगलेच ठणकावले आहे.
नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्री आणि खासदार असलेली कंगना राणौत हीच हिमाचल प्रदेशातील मनाली वीज उपविभागा अंतर्गत येणाऱ्या सिमशा या गावात घर आहे. हे घर बंद असतं. मात्र तरी देखील या घराचं महिन्याचं लाईट बिल हे एक लाख रुपये आलं होतं. त्यावर कंगना राणौतने वीज मंडळावर खडसावून टीका केली होती. कंगना म्हणाली होती की, या घरात मी राहतही नाही. तरी देखील एवढे बिल आलं आहे. त्यामुळे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की, देशाला आणि राज्याला विकासाच्या मार्गावर घेऊन जायचं आहे. मात्र हे लोक लांडगे आहेत. त्यांच्या तावडीतून आपल्याला राज्याला सोडवायचं आहे.
…म्हणून बाकी शेतकरीही कांदाच लावतात, कांद्याच्या भावावरुन मंत्री कोकाटेंनी शेतकऱ्यांनाच जबाबदार धरलं
यावर वीज मंडळाने खुलासा करत कंगनाच्या लाईट बिलाची हिस्ट्री सादर केली आहे. यामध्ये कंगनाला आलेल्या 90 हजार 384 रुपये लाईट बिलामध्ये मागील थकीत लाईट बिलासह बिल आलेले आहे. त्यामुळे कंगनाचा हे लाईट बिल एका महिन्याचं नसून मागील अनेक महिन्यांचा थकीत लाईट बिल असल्याचं वीज मंडळाने सांगितलं आहे. त्याचबरोबर कंगना राज्य सरकारच्या वीजबिलावरील सबसिडीचा देखील लाभ घेते. जी सबसिडी अनेक लोकांनी स्वेच्छेने सोडून दिलेली आहे. त्यामुळे या फेब्रुवारी महिन्यात तिला सातशे रुपयांची सबसिडी देखील मिळाल्याचं वीज मंडळाने सांगितलं आहे.